MMS व्हायरल झाल्यानंतर अक्षरा सिंगच्या वडिलांचा चढला पारा, आणि... 

सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक जापुरी चित्रपट अभिनेत्री अक्षरा सिंग आहे. 

Updated: Oct 20, 2022, 09:51 PM IST
MMS व्हायरल झाल्यानंतर अक्षरा सिंगच्या वडिलांचा चढला पारा, आणि... 

मुंबई : सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक जापुरी चित्रपट अभिनेत्री अक्षरा सिंग आहे. काही दिवसांपूर्वीच ही अभिनेत्री तिच्या एमएमएसच्या व्हिडिओमुळे प्रचंड चर्चेचा विषय बनली होती. हा व्हिडिओ पूर्णपणे फेक असला तरी त्यामुळे अभिनेत्रीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसं, सर्वांना माहित आहे की, सुपरहिट अभिनेत्री अक्षरा सिंगला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. दरम्यान, आता अक्षराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिचे वडील अभिनेत्रीला मारहाण करताना दिसत आहेत आणि हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

अक्षरा सिंहने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. अक्षराचा हा व्हिडिओ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे आणि अक्षराच्या या व्हिडिओमध्ये इंद्रजीत सिंग सेटवर पोहोचला आणि तिला बेदम मारहाण करू लागला.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अक्षरा स्वत:ला वाचवण्यासाठी कशी पळून जाते आणि त्यानंतर ती एका खोलीत घुसते. जिथे वडिलांचा फटका बसू नये म्हणून अभिनेत्री तिची बॅग उचलते आणि स्वतःचा बचाव करते. यानंतर अभिनेत्रीचे वडील तिचा हात आणि बॅग पकडतात आणि दोघंही एकमेकांशी बोलताना दिसत आहेत.

अक्षरा सिंगच्या वडिलांनी तिला मारहाण केली
हे नेमकं काय होत आहे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, अक्षराची इन्स्टा स्टोरी पाहून वडिल तिचावर रागावले होते. कारण अक्षराने या इन्स्टा स्टोरीवर जो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने वडिलांचा आवडता टी-शर्ट चोरून घातला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिच्या वडिलांना हे माहित नव्हतं, आता जेव्हा ती सेटवर येते तेव्हा त्यांना धक्का बसतो आणि म्हणून ते तिला मारहाण करू लागलात. हा व्हिडिओ पाहून, वडील आणि मुलीची धमाल पाहून चाहते खूप हसत आहेत आणि दोघांच्या जोडीचे जोरदार कौतुक करत आहेत.