Shah Rukh Khan On Aryan Khan Brands Clothes Price : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याचवेळा शाहरुख #AskSRK Session घेतो. यावेळी शाहरुखला त्याचे चाहते विविध प्रकारचे प्रश्न विचारतात. अशा परिस्थितीत शाहरुख त्याला जमेल तितक्या चाहत्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आता शाहरुख आपल्याला आहेत त्या प्रश्नांची उत्तर देणार हे कळतात सगळेच त्याला त्यांना असलेले प्रश्न विचारतात. बऱ्याचवेळा अनेक चाहते शाहरुखला त्याच्या खासगी आयुष्याविषयी विचारतात. आता शाहरुखला एका चाहत्यानं आर्यनच्या कपड्यांच्या ब्रॅंडविषयी प्रश्न विचारला आहे. त्या चाहत्याचं म्हणणं होतं की आर्यनच्या ब्रॅंडचे कपडे थोडे अफॉर्डेबल म्हणजेच परवडेल अशा किंमतीत करा. जेणे करून आमच्यासारखी साधारण माणसं ते कपडे घेऊ शकू. त्याला शाहरुख खाननं देखील हटके अंदाजात त्याला उत्तर दिलं आहे.
शाहरूखन त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे सेशन घेतलं होतं. शाहरुखनं त्याच्या चाहत्यांना जवानशी संबंधीत प्रश्न विचारायला सांगितले होते. मात्र, शाहरुखला त्याच्या चाहत्यानं आर्यनच्या ब्रॅंडचे कपडे स्वस्त करण्यास सांगितले. नेटकरी कमेंट करत म्हणालास ‘D’YAVOL X’ ब्रँड चे जॅकेट 1 हजार ते 2 हजारपर्यंत बनवा, ते जॅकेट विकत घेण्यात अख्ख घर जाईल.' या मागणीला शाहरुख खाननं भन्नाट उत्तर दिलं आहे. शाहरुख म्हणाला, हे 'D’Yavol X वाले लोक मलापण स्वस्तात विकत नाहीत, मी काहीतरी करतो'. शाहरुखचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
Yeh D’Yavol X wale log mujhe bhi sasti nahi bech rahe….kuch karta hoon..!! #Jawan https://t.co/PLW9WUd6mg
— Shah Rukh Khan (@iamsrk) May 6, 2023
आर्यननं नुकतंच त्याचं स्वतःचं ‘D’YAVOL X’ हे कपड्यांचं ब्रँड सुरू केलं आहे. इतकंच काय तर आर्यननं स्वतः या ब्रँडच्या जाहिरातीचं दिग्दर्शन केलं आहे. 30 एप्रिल रोजी या ब्रँडच्या साईटवर कपड्यांचं कलेक्शन लॉन्च करण्यात आलं. तर या ब्रँडच्या कपड्यांची किंमत पाहून नेटकरी आर्यन खानला ट्रोल करू लागले आहेत. तर आर्यनच्या ब्रँडच्या एका कपड्याची किंमत ही 30-40 हजार आहे. तर त्यातील काही कपडे हे लाखांच्या घरात आहेत. आर्यन खानच्या ब्रँडमधील एका जॅकेटची किंमत तर 2 लाख रुपये आहे. त्यानं कपड्यांची किंमत इतकी महाग ठेवल्यानं सोशल मीडियावर तो ट्रोलिंगचा शिकार झाला आहे.
हेही वाचा : Ponniyin Selvan 2 चित्रपटाच्या रक्षिता सुरशेचा गंभीर अपघात, म्हणाली 'तो क्षण आठवल्यानंतर माझं अंग...'
आर्यननं जेव्हा त्याच्या या नव्या ब्रॅंडचा प्रोमो शेअर केला होता. तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की तो शाहरुखचा कोणत्या प्रोजेक्टचा दिग्दर्शन करत आहे. पण नंतर ते त्याच्याच ब्रॅडचं होतं हे समोर आलं.