मुंबई : बी टाऊनची 'बेबो' अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) हिनं कायमच तिच्या रुपानं सर्वांना भुरळ घातली आहे. करीना आणि तिच्या सौंदर्याची चर्चा अगदी तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच होत आहे. अभिनेता सैफ अली खानची पत्नी आणि दोन मुलांची आई असतानाही करीनानं तिच्या सौंदर्याची लकाकी मात्र कायम ठेवली आहे.
अनेकदा जीवनाच्या या धकाधकीमध्ये महिला स्वत:वर लक्ष देणं टाळतात. पण, करीना मात्र याला अपवाद ठरत आहे. तिच्या या सौंदर्यामागे नेमकं काय बरं गुपित असेल, हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? अनेकांनाच हा प्रश्न पडत आहे, ज्याचं उत्तर आता खुद्द करीनानंच दिलं आहे.
झिरो साईज फिगर असो किंवा मग गरोदरपणानंतरचं वाढलेलं वजन, प्रत्येक वेळी करीनानं तिच्या फिटनेसकडे लक्ष देत आपल्या शरीराराला काय योग्य तेच करण्यावर भर दिला आहे. हे सिक्रेट आता कुद्द करीनानंच सर्वांसमोर आणलं आहे.
करीनानं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिच्या सौंदर्याचं आणि सुदृढतेचं गुपित उघड झालं आहे. तिनं पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये करीना हाता एक थाळी घेऊन दिसत आहे. या थाळीमध्ये तिनं खूप सारे अक्रोड भरल्याचं दिसत आहे आणि हेच आहे तिच्या सौंदर्य आणि निरोगी आयुष्याचं सिक्रेट.
अक्रोडमध्ये असणाऱ्या नैसर्गिक गुणांमुळं याचं सेवन करण्याचा सल्ला कायमच अनेक आहारतज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळं तुमच्यासाठीही करीनाचं हे सिक्रेट आणि बहुगुणी अक्रोड उपयुक्त ठरतंय का, एकदा पाहाच.