संजय दत्तचा आजारपणातील फोटो व्हायरल

चाहत्यांनी बरं होण्यासाठी दिल्या शुभेच्छा 

Updated: Oct 5, 2020, 09:56 AM IST
संजय दत्तचा आजारपणातील फोटो व्हायरल  title=

मुंबई : सोशल मीडियावर अभिनेता संजय दत्तचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमुळे पुन्हा एकदा संजय दत्तच्या आरोग्याची चर्चा होत आहे. त्याचे चाहते त्याच्या तब्बेतीबाबत अतिशय काळजी घेताना दिसत आहे. या फोटोतून संजय दत्तची आताची प्रकृती कळत आहे. 

या फोटोत संजय दत्तने निळ्या रंगाचं कॉलरचं शर्ट, भडक निळ्या रंगाची कार्गो पँट, सफेद रंगाचे कॅनव्हास शू आणि एक स्लिंग बॅग घेताना दिसत आहे. या फोटोत संजय दत्तचं भरपूर वजन कमी झालं असून तो थोडा अशक्त देखील दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#Sanjaydutt  #getwellsoon

A post shared by Silverlining-India (@silverliningindia1) on

हा फोटो व्हायरल झाल्यावर नेटिझन्स,'मुन्ना भाई, एम.बी.बी.एस' म्हणत त्याला शुभेच्छा देत आहेत. अनेक चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. संजय दत्तने कामातून ब्रेक घेतला असून तेव्हापासून त्याच्या प्रकृतीत भरपूर बदल झाला आहे. 

११ ऑगस्टला संजय दत्तने आपण ब्रेक घेतल्याचं सांगितलं. ६१ वर्षीय अभिनेत्याने नेमतं आपल्याला काय झालं याची माहिती दिली नाही. पण आपण सिनेमाच्या शुटिंगमधून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं. तर ट्रेड ऍनलिस्ट कोमल नाहताने दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आहे. 

संजय दत्त केजीएफ : चॅप्टर २ सिनेमात काम करत आहे. महेश भट्ट यांच्या 'सडक 2' सिनेमात दिसला असून भूज या सिनेमातही तो दिसणार आहे.