Sanjay Dutt : बॉलिवूड असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती, सर्वांनाच श्रीमंत व्हायचे असते. याचसाठी ते इंडस्ट्रीमध्ये किंवा व्यवसायामध्ये उतरतात. ज्यामध्ये अनेक जणांचे उत्पन्नाचे स्त्रोत हे वेगवेगळे आहेत. अशातच आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तच्या बिझनेसबद्दल सांगणार आहेत. ज्याची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. संजय दत्तने डिसेंबर महिन्यात द ग्लेनवॉक नावाचा स्कॉच व्हिस्की ब्रँड बाजारात आणला होता. जो काही दिवसांमध्येच खूप लोकप्रिय झाला. या ब्रँडची अवघ्या काही दिवसांमध्ये बाजारात तुफान विक्री झाली. ज्यामधून संजय दत्तने फक्त 45 दिवसांमध्ये 15 कोटींची कमाई केली.
त्याच्या स्कॉच व्हिस्की ब्रँडने 200 मिलीच्या 3 लाखांहून अधिक बॉटल बाजारात विकल्या आहेत. या बॉटलची किंमत बाजारात 500 रुपये इतकी आहे. ज्यामधून त्याने फक्त दीड महिन्यात 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. सध्या त्याच्या या स्कॉच व्हिस्की ब्रँडची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशातच या व्यवसायाशी आणखी एका व्यक्तीचे नाव जोडले गेले आहे.
युवराज सिंगचा व्यवसायात प्रवेश
भारतीय क्रिकेटर युवराज सिंग देखील दारू व्यवसायात उतरला आहे. युवराज सिंगने त्याचा नवीन लक्झरी टकीला ब्रँड लॉन्च केला आहे. त्यांनी प्रीमियम श्रेणीसाठी त्यांचा टकीला हा ब्रँड लॉन्च केला आहे. सध्या हा ब्रँड अमेरिकन बाजारात उपलब्ध आहे. मात्र, लवकरच तो भारतात देखील लॉन्च केला जाणार आहे. अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या एका खास कार्यक्रमात युवराजने त्याचा टकीला ब्रँड FINO लॉन्च केला.
यावेळी त्याने सांगितले की, FINO मध्ये माझ्या मते सर्वकाही आहे. एप्रिल 2025 पर्यंत तो भारतीय बाजारपेठेतही लाँच होईल अशी अपेक्षा आहे. हा ब्रँड लॉन्च करताना युवराज सिंग खूप उत्साहित दिसत होता. संजय दत्त किंवा युवराजच नाही तर बॉलिवूडचा खलनायक डॅनी डेन्झोंगपाचा देखील दारू व्यवसाय आहे. डॅनी हा प्रसिद्ध बिअर ब्रँड युकसोम बेवरेजचा मालक आहे. हा भारतातील तिसरा सर्वात मोठा बियर ब्रँड आहे.