Samantha Ruth Prabhu Valentine's Day Post : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. समांथा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. इतकंच नाही तर यावेळी समांथा अशा काही पोस्ट करते ज्यामुळे तिच्या कामापेक्षा तिचं खासगी आयुष्य जास्त चर्चेत येतं. समांथानं नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून ही व्हॅलेन्टाईन खास पोस्ट आहे. त्यामुळे आता चर्चा सुरु झाली आहे की घटस्फोटानंतर अखेर समांथाच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली असं म्हटलं जात आहे.
समांथानं व्हॅलेन्टाइन डे साजरी केला आहे. या खास निमित्तानं समांथानं एक खास पोस्ट देखील शेअर केली आहे. यात ती कोणासोबत तरी असल्याचं दिसून येत आहे. प्रेमाचा दिवस साजरा करणाऱ्यांमध्ये समांथा देखील सहभागी आहे. तिनं यावेळी सगळे फोटो हे लाल रंगात तिनं शेअर केले आहेत. तर समांथानं यावेळी पांढऱ्या रंगाच्या लॉन्जरेमध्ये दिसत आहे.
दरम्यान, समांथानं शेअर केलेल्या फोटोमध्ये सगळ्यांचं लक्ष हे एका फोटोनं वेधलं आहे. एका फोटोमध्ये समांथाच्या हातात लाल रंगाचं ड्रिंक आहे तर तिच्यासमोर कोणी व्यक्ती बसला आहे. फोटोला पाहून नेटकरी प्रश्न विचारत आहेत की समांथानं या पोस्टमध्ये तिच्या नात्याला कन्फर्म केलं आहे. पुढे समांथानं या पोस्टमध्ये हृदय, फूलं आणि रेस्टॉरंटचे फोटो शेअर केले आहेत. त्याशिवाय तिनं पार्टनर सोबत केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची लिस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : 'छावा'नं पहिल्या दिवशी कमवले 30,00,00,000 कोटी; विकी कौशलच्या शिरपेचात मानाचा तुरा
समांथाची पोस्ट पाहून सगळे एकच बोलत आहेत की समांथाला प्रेम झालं आहे. बऱ्याच काळापासून समांथा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. तर आता तिनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये किती तथ्य आहे किंवा ती खरंच रिलेशनशिपमध्ये आहे का हे सांगता येणार नाही. तर दुसरीकडे समांथाचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यनं तिच्याविषयी बोलताना म्हटलं होतं की तिनं मुव्ह ऑन केलं आहे. तर समांथानं अजून तिच्या मिस्टर राइटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. पण तिच्या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.