Saif Ali Khan and Amrita Singh Divorce: बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमाची नाती जुळतात आणि बिघडतातही. कधी कोणी डेटींग करत तर कधी कोणी सिरियसी त्या नात्याचा विचार करतं. तर कधी कोणाचं ब्रेकअप (Breakups in Bollywood) होतं हेही कळतं नाही. कधी कोणी थाटामाटात लग्न करतं तर कोणी कधी घटस्फोट घेईल हे काही सांगता येत नाही. बॉलिवूडची (Bollywood) नाती ही अशीच असतात त्यातील अशी अनेक नाती अत्यंत गाजली ती त्यांच्या घटस्फोटामुळेच. त्यातीलच एक नावं म्हणजे सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचे. ही जोडी कधीतरी आपल्या मस्त वैवाहिक आयुष्याशी स्वप्न पाहत होती तर कधी त्यांचा घटस्फोट झाला हेही त्यांना कळलं नाही. परंतु त्यांच्या घटस्फोटामागील (Bollywood Celebrity Divorce) नक्की काय काय होते हे काय कोणाला कळले नाही. पण असे म्हटले जाते की याला अमृताच जबाबदार होती?
1991 साली सैफ अली खान आणि अमृता सिंग (Amrita Singh and Saif Ali Khan Marriage) यांनी लग्न केले. त्यावेळी त्या दोघांचे लग्न खूप गाजले होते कारण त्या दोघांमध्येही वयाचे फार अंतर होते. सैफ अली खान हा अमृता सिंगपेक्षा 12 वर्षांनी लहान होता. त्या दोघांचा संसारही उत्तमरीत्या चालत होता. त्यातून त्यांनी दोन मुलंही झाली. सारा अली खान आणि अब्राहम अली खान अशी दोन मुलंही त्यांना आहेत. सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे. अब्राहमही साहाय्य दिग्दर्शक म्हणून काम पाहतो आहे.
सैफ अली खान आणि अमृता सिंगची प्रेमकहाणी अनेकदा चर्चेत राहिली आहे. आजही त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल (Love Stories in Bollywood) चर्चा केली जाते. त्यांनी आपल्या पर्सनल लाईफबद्दलचे अनेक खुलासे सिमी गरेवाल यांच्या चॅट शोमध्ये केलेले आहेत. लग्नअगोदर प्रत्येक कपल्सप्रमाणे सैफ आणि अमृता एकमेकांना डेट करत होते. सैफ दोन दिवस अमृताच्या घरी राहायलाही गेला होता, असेही त्याने त्या चॅट शोमध्ये सांगितले होते. अमृतानं सैफला त्यांच्या पहिल्याच डेटमध्ये कीस केलं होतं.
अमृता आणि सैफमध्ये (Saif and Amrita Divorce) अनेक मतभेद वाढू लागले होते. त्यांच्यातील वयाचे अंतर हाे त्यांच्या कुटुंबियांनाही मान्य नव्हते त्यातून त्यांच्यातही वाद आणि भांडणं होऊ लागली होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांपासून विभिक्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा घटस्फोट झाला.