रामायण चित्रपटासाठी व्हेजिटेरियन झालीस का प्रश्नावर चिडली साई पल्लवी! मग अभिनेत्री शाकाहारी की मांसाहारी?

'रामायण' सिनेमाची घोषणा झाल्यानंतर कास्ट, सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित इतर गोष्टींची चर्चा होत आहे. या सिनेमात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री साई पल्लवी शाकाहारी आहे की मांसाहारी? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. याला साई पल्लवीने दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 12, 2024, 05:51 PM IST
रामायण चित्रपटासाठी व्हेजिटेरियन झालीस का प्रश्नावर चिडली साई पल्लवी! मग अभिनेत्री शाकाहारी की मांसाहारी? title=

'रामायण' सिनेमाची घोषणा झाल्यानंतर कास्ट, सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित इतर गोष्टींची चर्चा होत आहे. या सिनेमात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री साई पल्लवी शाकाहारी आहे की मांसाहारी? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. याला साई पल्लवीने दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. 

नितेश तिवारी यांनी 'रामायण' या सिनेमाची घोषणा केली. तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमात रणबीर कपूर रामाची भूमिका साकारत आहे तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे. जेव्हापासून ही भूमिका साई पल्लवी करत आहे तेव्हापासून तिला तू शाकाहारी आहेस की मांसाहारी? असा प्रश्न विचारला जात आहे. या सगळ्यावर भडकून साई पल्लवीने  खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे. 

अफवांवर संतापलेल्या साई पल्लवीने तिच्या अधिकृत अकाऊंटवरुन पोस्ट केलं आहे की, मी गप्प राहणे पसंत करते आणि अशा प्रसंगी काहीही बोलू शकत नाही." साईपल्लवीला वेगवेगळ्या मीडियामधून तू मांसाहार सोडलास का? असा प्रश्न विचारला जात होता. कारण ती या सिनेमात सितेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच अशी देखील चर्चा आहे की, साई पल्लवी शुटिंग किंवा इतर प्रवासा दरम्यान आपले शेफ सोबत घेऊन फिरते कारण ती शाकाहारीच आहे. 

तर खरं काय? 

साई पल्लवी नेहमीच शाकाहारी राहिली आहे. अभिनेत्रीने एकदा एका मुलाखतीत म्हटले होते की, ' मी कायम शाकाहारी आहे. मी कधीच कुणाला मरताना पाहू शकत नाही. मी कोणत्याच व्यक्तीला दुखवू शकत नाही तसेच मी हा विचार करु शकत नाही की, ठिक आहे तो यासाठी पात्र आहे. 

साई पल्लवीचा 'अमरन' सिनेमा

साई पल्लवी तमिळ सिनेमा 'अमरन' मध्ये दिसली आहे. शिव अरुर आणि राहुल सिंह यांची बुकी सीरीज 'इंडियाज मोस्ट फियरलेस ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिट्री हिरोज' वर आधारित आहे.