Rupali Ganguly : 'अनुपमा' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली ही गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. रुपालीवर तिच्या सावत्र मुलीनं खूप गंभीर आरोप केले आहेत. तिच्या लेकीनं केलेल्या या सगळ्या आरोपांनंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. खरंतर, रुपाली गांगुलीचं अश्विन के वर्मासोबत हे दुसरं लग्न आहे. त्या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. तर अश्विन यांना पहिल्या लग्नातून एक मुलगी असून ईशा असं तिचं नाव आहे. तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिचे वडील अर्थात अश्विन आणि सावत्र आईविषयी धक्कादायक दावे केले आहेत.
'टाइम्स नाउ' ला दिलेल्या मुलाखतीत ईशा वर्मानं खुलासा केला की रुपालीनं तिच्या आईला खूप वाईट वागणूक दिली. तिच्या संपूर्ण कुटुंबाला माहितही नव्हतं की तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आहे आणि त्यांना एक मुलगा देखील आहे.
ईशानं पुढे सांगितलं की अश्विन यांनी दोन वेळा घटस्फोटाचे पेपर तिच्या आईला दिले आणि काहीही न सांगता भारतात आले. तिला किंवा तिच्या कुटुंबाला कळलं ही नाही की तिच्या वडिलांनी इथे दुसरं लग्न केलं. तिला तिच्या सावत्र आई विषयी आणि तिला एक मुलगा आहे याविषयी बातम्यांमधून कळलं.
पुढे ईशा वर्मानं रुपाली गांगुलीच्या मुलाविषयी धक्कादायक दावा केला आहे. ईशानं सांगितलं की 'रुपालीचा मुलगा हा प्रीमॅच्योर डिलिव्हरीनं झाला नाही तर लग्ना आधीच त्याचा जन्म झाला होता. इतकंच नाही तर ईशानं रुपालीवर घर तोडण्याचा आरोप देखील केला होता. रुपाली गांगुलीनं यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.'
हेही वाचा : पत्नीच्या पाया पडल्यानं विक्रांत मैसी ट्रोल; उत्तर देत म्हणाला, 'घरात शांती...'
ईशानं सांगितलं की 'आम्हाला तर कोणत्याही गोष्टीविषयी सांगितलं नव्हतं. आम्ही जेव्हा भारतात आलो आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की त्यांना आम्हाला भेटायचं नाही तेव्हा मला खूप वाईट वाटलं. ते रुपालीसोबत होते आणि त्यांना एक मुलगा देखील झाला होता. ते सगळ्यांना सांगायचे की मुलाची डिलिव्हरी ही प्रीमॅच्युअर होती. पण हे सगळं खोटं आहे. दोघांतं लग्न फेब्रुवारीमध्ये झालं आणि मुलाचा जन्म ऑगस्टमध्ये. माझ्याकडे पुरावा आहे की रुपाली ही लग्नाच्या आधी प्रेग्नंट होती.'