मुंबई : अभिनेता अक्षय कुमार त्याच्या बॉलिवूडमधील सुरुवातीच्या काळात त्याच्या स्टंट्स, चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे खूप लोकप्रिय झाला. अक्षयचं नाव त्याच्या बर्याच नायिकांसोबत जोडलं गेलं. त्यामध्ये शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडन यांची नावं देखील आहेत. २००१ मध्ये अक्षयने राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्नाशी लग्न केलं आणि त्यानंतर प्रियंका चोप्रा आणि अक्षयच्या अफेअरची चर्चा सुरु झाली.
मात्र हे दोघंही आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्य आनंदात आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरने संपूर्ण बॉलिवूड हादरवून गेलं होतं. बॉलिवूड कॉरिडोरमध्ये प्रियांका आणि अक्षयचं नातं चर्चेचा विषय ठरलं. मिस वर्ल्डचा मुकूट परिधान केल्यावर प्रियंकाने अक्षय कुमारसोबत 'अंदाज' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एट्री घेतली. त्यांची केमिस्ट्री लोकांनाही फार आवडली.
यानंतर या दोघांनी एकत्र 'ऐतराज' आणि 'वक्त' चित्रपटात काम केलं. इतकंच नव्हे तर ट्विंकल खन्नाने प्रियंकासोबत 'वक्त' या चित्रपटाच्या सेटवर भांडणही केलं. अक्षयने ट्विंकलला तिथे शांत केलं. आपलं लग्नाचं नातं वाचविण्यासाठी ट्विंकलने सगळं काही पणाला लावलं.
ट्विंकल बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक असलेल्या 'खन्ना फॅमिली'मधून असून ती डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांची मुलगी आहे. अक्षय आणि प्रियंकाच्या अफेअरच्या अफवांमुळे खन्ना कुटुंबाची प्रतिष्ठा धोक्यात येत होती.
त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अक्षय आणि प्रियांकाची जोरदार चर्चा सुरू होती. 'वक्त' चित्रपटाच्या सेटवर गोंधळ झाल्यानंतर अक्षयने ट्विंकलला पुन्हा प्रियंका चोप्रासोबत काम करणार नसल्याचं प्रॉमिस दिलं. याशिवाय या अफवांमुळे प्रियंकालासुद्धा तिच्या कारकिर्दीवर परिणाम होऊ द्यायचा नव्हता.
म्हणूनच त्यांनी त्यांच्या आयुष्यात मागे नं वळता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच या दोघांचे संबंध ईथेच संपले. अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचे आत्ता पर्यंतचे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. 2003 मध्ये 'अंदाज' चित्रपटाच्या यशानंतर 2004 मध्ये त्यांनी 'ऐतराज' आणि 2005 मध्ये 'वक्त: रेस अगेंस्ट टाइम' मध्ये काम केलं.