गुगल सर्चमध्ये रानू मंडल दुसऱ्या क्रमांकावर

गुगलने २०१९ मध्ये भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या गाण्यांची यादी जाहीर केली आहे.  

Updated: Dec 13, 2019, 03:06 PM IST
गुगल सर्चमध्ये रानू मंडल दुसऱ्या क्रमांकावर  title=

मुंबई : पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्थनकाबाहेर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्या आयुष्याला चांगलीच कलाटनी मिळाली आहे. 'एक प्यार का नगमा है' गाण्याने त्यांना एक वेगळी ओळख दिली. एका रात्रीत इन्टरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू मंडल आता प्रसिद्ध गायकांच्या यादीत विराजमान झाल्या आहेत. त्यांच्या प्रसिद्धीचा अंदाज खुद्द गुगलने लावला आहे. 
 
गुगलने २०१९ मध्ये भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या गाण्यांची यादी जाहीर केली आहे. आश्चर्याचं म्हणजे या यादीमध्ये रानू मंडल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रानू यांच्या पहिल्या 'तेरी मेरी कहानी' या गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Recorded teri meri kahani my new song from happy hardy and heer with the very talented ranu mondal who has a divine voice , all your our dreams can come true if we have the courage to peruse them , a positive attitude can really make dreams come true , thanks for all your love and support

गुगलने जाहीर केलेल्या १० टॉप गाण्यामध्ये पहिल्या स्थानी 'ले फोटो ले' हे राजस्थानी गाणं आहे, तर दुसऱ्या स्थानी रानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' गाणं आहे. तिसऱ्या स्थानी 'तेरी प्यारी प्यारी दो अंखियां', चौथ्या स्थानी 'वास्ते' त्यानंतर  'कोका-कोला तू', 'गोरी तेरी चुनरी बा लाल लाल रे', 'पल-पल दिल के पास', 'लड़की आंख मारे', 'पायलिया बजनी लाडो पिया', 'क्या बात है' असे दहा गाणी आहेत. 

तब्बल १० वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात सोनेरी दिवस आला आहे. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्थानकावर त्या गात असायच्या. लता मंगेशकर यांच्या 'एक प्यार का नगमा हैं' या गाण्याने त्यांच्या नशिबाचा दरवाजा उघडला. आणि त्यांच्या बॉलिवूडच्या प्रवासाला सुरूवात झाली. गायक हिमेश रेशमिया त्यांच्यासाठी गॉड फारद ठरल्याचे म्हणायला काही हरकत नाही.

सध्या त्या त्यांच्या आगामी बायोपिकच्या कामात व्यस्त आहे. नुकताच त्यांनी स्वत: फेसबुक अकाउंट जारी केलं आहे. फेसबूकवर त्या नेहमी त्यांच्या आयुष्यातील चालू घडामोडी शेअर करतात. रानूंच्या प्रवासाची कथा दिग्दर्शक ऋषिकेश मंडल बायोपिकच्या माध्यमातून जगा समोर आणणार आहेत. 

चित्रपटाची निर्मिती शुभोजित मंडल करणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात रानू मंडल यांच्या आयुष्याचा प्रवास रूपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.