मुंबई : कॉमेडिअन राजू श्रीवास्तवला आपल्या फेसबूक पोस्टवरून सर्वांची माफी मागण्याची वेळ आली आहे. 'एंटरटेन्मेंट की रात' या शो मध्ये राजू श्रीवास्तवच्या कॉमेडीचे फटकारे पाहायला मिळत होते. यावेळी बिग बॉस ११ मधील पॉप्यूलर स्पर्धक शिल्पा शिंदेवर आपत्तीजनक जोक्स केले.
त्यानंतर राजूला सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या नाराजीचा सामना करावा लागला. दरम्यान सर्व प्रकरणावर पडदा टाकत राजूने फेसबूक पोस्ट लिहून माफी मागितली आहे.
या शो मध्ये मुबीन ही शिल्पाचा रोल करताना दिसली. यावेळी शिल्पा बनललेल्या मुबीनशी राजू बोलला, "तू चॅनलची आभारी राहायला हवं, त्यामूळे तुला एवढा मान-सन्मान मिळाला. नाहीतर तुझ्यानावे कोणी चिठ्ठीही लिहणार नाही.
संपूर्ण घरात आई बनून फिरत आहेस. आई बनण्याची एवढी हौस आहे तर बाहेर ये शक्ती कपूर तुझी वाट पाहतोय. माझ्या चपला मी का खराब करु ? "
give some respect to women and especially mothers @iRajuSrivastava #shameonyou #bb11 #biggboss11 #WeStandByShilpa @RealVinduSingh @tentej @BandagiKalra #EntertainmentKiRaat #RajuShrivastavKeMuhPeJootepic.twitter.com/RBDUHvUeql
— sara khan (@KhanSara3050) December 24, 2017
त्यानंतर शिल्पाच्या फॅन्सनी राजूला सोशल मीडियावर चांगलेच धारेवर धरले. राजूने यावर माफी मागत कलर्स चॅनलने डायलॉग एडीट करून दाखविल्याचा आरोप केला आहे.
राजू म्हणतो, माझ्या प्रिय मित्रांनो, मी तुमच्या कमेंट्स वाचून हैराण झालोय, मला यावर माझी बाजू मांडायची आहे.
मी कोणत्याही महिलेचा अपमान करु शकत नाही. हा विचारदेखील मी करु शकत नाही. मी एक पती आणि एका मुलीचा बाप आहे. महिलांची इज्जत करतो. शिल्पा माझी को-स्टार होती. माझ्या नजरेत तिच्यासाठीही तेवढीच इज्जत आहे. माझे डायलॉग एडीट करत चॅनल प्रोड्यूसरने चुकीच्या पद्धतीने दाखविला आहे.
माझा खरा डायलॉग असा होता, ''तुला आई बनण्याची एवढी हौस असेल तर बाहेर पड, शक्ती कपूर तुझी वाट पाहतोय, सिनेमात आई बनविण्यासाठी आणि नवाजुद्दीनदेखील सिनेमात तुला आपली आई बनविण्यास तयार आहे.''
मी कलर्स चॅनल्सशी नाराज आहे. त्यांनी माझा डायलॉग चुकीच्या पद्धतीने दाखविला. तरीही ज्यांना यामूळे वाईट वाटले त्या सर्वांची मी माफी मागतो. असे राजूने आपल्या फेसबूक पोस्टवर लिहिले.