राजपालला आईवडिल म्हणाले डॉक्टर हो, पण तो खरंच डॉक्टर झाला असता तर...

राजपाल यादव आपल्या बेस्ट कॉमेडी टाईमींगमुळे त्याला आठ वेळा 'बेस्ट कॉमिक अवॉर्ड'साठी त्याला नॉमिनेशन मिळालं होतं

Updated: Apr 18, 2021, 06:21 PM IST
राजपालला आईवडिल म्हणाले डॉक्टर हो, पण तो खरंच डॉक्टर झाला असता तर... title=

मुंबई : हिंदी सिनेमात जॉनी लिव्हर नंतर राजपाल यादव हा दुसऱ्या क्रमांकाचा विनोदवीर म्हणून मानला जातो. राजपाल यादव आपल्या बेस्ट कॉमेडी टाईमींगमुळे त्याला आठ वेळा 'बेस्ट कॉमिक अवॉर्ड'साठी त्याला नॉमिनेशन मिळालं होतं. पण त्याला निगेटिव्ह रोलसाठी अवॉर्ड मिळाला. राजपालने आपला ॲक्टींगच्या करिअरची सुरुवात दूरदर्शनमधून केली. आणि यासाठी त्याला प्रसिद्धी देखील मिळाली.           

उत्‍तर प्रदेशमधील शाहजहांपुर जिल्हा्यातील कुंद्रा गावात १६ मार्च १९७१मध्ये राजपालचा जन्म झाला. त्यांनं डॉक्टर व्हावं अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती पण अभिनयातील त्याची आवड आणि भाग्या यामुळे त्याला सिनेसृष्टीमध्ये खेचलं. एका मुलाखतीमध्ये राजपाल यादव म्हणाला होता की, जर तर जर तो अभिनेता नसता तर तो आपल्या शहरातील ऑडीनेस कपड्यांच्या फॅक्टरीत काम करत असता. रोहिलखंड विद्यापीठातून राजकारण आणि समाजशास्त्र विषयात शिक्षण घेत असताना तो नाट्यसृष्टीत रुजू झाला.                                   

चाहत्यांना चित्रपटांमध्ये विनोदकार म्हणून राजपाल आवडू लागला. राजपाल यादवला जवळ-जवळ दहा वेळा कॉमेडी अवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळालं. सगळ्यात जास्त वेळा बेस्ट कॉमेडी रोल साठी त्याला अमिनेशन मिळालं. 2013 मध्ये आलेला सिनेमा 'हंगामा', 'कल हो ना हो', २००४मध्ये फिल्म 'मुझसे शादी करोगी', २००५मध्ये 'मे मेरी पत्नी और वो', २००७मध्ये 'भुलभुलैय्या', २००८ मध्ये 'भूतनाथ' आणि 'क्रेझी ४', या सिनेमांत त्याला बेस्ट कॉमेडी रोलसाठी 'फिल्मफेअर' 'स्‍क्रीन', 'अप्सरा', 'झी सिने'  याव्यतिरिक्तही अनेक नॉमिनेशन त्याला मिळाली. २००४मध्ये 'मे माधुरी दिक्षित बंना चाहती हू' यासाठी राजपाल सपोर्टिंग रोल साठी नॉमिनेट झाला.

राजपाल यादवने कॉमेडी व्यतिरिक्त बऱ्याच चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये 'मे माधुरी दिक्षित बंना चाहती हू', 'लेडीज टेलर', 'रामा रामा क्या है ड्रामा', 'हॅलो हम लल्लन बोल रहे है', 'कुस्ती मिर्च और बबलू', 'मे मेरी पत्नी और वो', यांचा समावेश आहे राजपालला 'हंगामा' सिनेमा नंतर बरीच प्रसिद्धी मिळाली. चुपचुपकेमधील बरेच डायलॉग त्याचे व्हायरल झाले. 'हंगामा', 'हेराफेरी', 'गरम मसाला', 'ढोल' या चित्रपटातील पत्रांमधून त्याला लोकप्रियता मिळाली.