लाइव्ह चॅटमध्येच प्रियांका चोप्रा Oops Momment ची शिकार; पाहा व्हिडिओ

प्रियांका चोप्रा आजच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Updated: Apr 12, 2022, 09:45 PM IST
लाइव्ह चॅटमध्येच प्रियांका चोप्रा Oops Momment ची शिकार; पाहा व्हिडिओ  title=

मुंबई : प्रियांका चोप्रा आजच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती देशातच नव्हेतर परदेशातही प्रसिद्ध आहे. आजच्या काळात ती ग्लोबल स्टार आहे. तिच्याकडून एक जरी चूक झाली तर ती संपूर्ण जगाला दिसते. ग्लोबल स्टार असल्याने अभिनेत्रीही तिच्या स्टाइलची खूप काळजी घेते. पण कधी-कधी ती या सगळ्यांमध्ये oops momment ची शिकारही होते.

प्रियंका निकची जोडी
बॉलीवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियांका चोप्राच्या फॅन फॉलोइंगबद्दल बोलायचं झालं तर जगभरातील लोकं तिला पसंती देतात. प्रियांका चोप्राने 2018 साली परदेशी सिंगर निक जोनाससोबत लग्न केलं होतं. या दोघांच्या लग्नाने एकच खळबळ उडाली होती. जगभरातील सगळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारच्या चर्चाही झाल्या. लग्नानंतर प्रियांका आणि निकचे अनेक व्हिडिओ व्हायरलही झाले. अनेकवेळा ती तिच्या नवऱ्यासमोर oops momment ची शिकारही झाली.

प्रियंकाचा oops momment
व्हायरल होत असलेला प्रियांका चोप्राचा व्हिडिओ एका लाईव्ह सेशनचा आहे. खरंतर हा व्हिडिओ बराच जुना असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडिओ दोघांच्या लाइव्ह चॅटच्या माध्यमातून समोर आला आहे. या व्हिडिओत या दोघांनीही आपापल्या तब्बेतीची माहिती दिली होती. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आयसोलेट होते तेव्हाची ही गोष्ट आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यादरम्यान प्रियांका चोप्राने सूट घातला होता. मात्र असाच काहीसा प्रकार समोर आला जेव्हा प्रियंका चोप्राला ओप्स मोमेंटची शिकार व्हावं लागलं. आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, अभिनेत्री या लाईव्ह सेशन दरम्यान अचानक उठते आणि तिचा टॉप वर जातो. त्यामुळे तिचे अर्तवस्त्र स्पष्टपणे दिसतात. आणि अभिनेत्री oops momment ला बळी पडते. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.