प्रार्थना बेहरेचं हे आहे 'डेस्टिनेशन वेडिंग'

प्रार्थना गोवा समुद्र किनाऱ्यालगतच्या एका शानदार हॉटेलमध्ये लग्न करणार आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 14, 2017, 04:40 PM IST
 प्रार्थना बेहरेचं हे आहे 'डेस्टिनेशन वेडिंग' title=

मुंबई :  कॉफी आणि बरंच काही, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, मितवा, मि अँड मिसेस सदाचारी या सिनेमातील मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे तिने जाहीर केल्यानंतर ती कुठे जाऊन लग्न करणार याबद्दलची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली होती. याची माहिती आता तिने दिली आहे.  

काही दिवसांपूर्वी आपल्या साखरपुड्याची बातमी तिने सर्वांना कळविली होती. त्यांतर तिचे लग्न कधी होणार याबद्दलही चर्चा रंगली होती. १४ नोव्हेंबर २०१७ ला प्रार्थनाचे लग्न ठरले असून ती गोवा समुद्र किनाऱ्यालगतच्या एका शानदार हॉटेलमध्ये लग्न करणार आहे. सध्या तिने सर्व प्रोजेक्ट बाजूला ठेवून लग्नाच्या खरेदी आणि तयारीकडे लक्ष दिले आहे. सिनेसृष्टीतील अनेक तारे-तारकांनी प्रार्थनाच्या लग्नाची तारीख आधीच बुक करुन ठेवली आहे. अनेकजण लग्नाच्या एक दिवस आधीच गोव्यात पोहोचणार आहेत. 
प्रार्थनानेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर साखरपुड्याचा फोटो पोस्ट करून तिच्या फॅन्सना याबाबत सांगितले होते. आम्ही एकमेकांसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतलाय, असं तिने फोटो शेअर करताना म्हटले होते.

 

We decided to be FOREVER ... #engaged #forlife #forevercommitted #lifepartner #myfiancé #happyme #godiskind 

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

प्रार्थनाचा होणारा नवरा अभिषेक दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध वितरक आहे. त्याने डब्बा एैस पैस, सॉल्ट आणि प्रेम या सिनेमांची सहनिर्मिती केलीये. तसेच काही सिनेमांचे दिग्दर्शनही केलय. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. डब्बा एैस पैस, सॉल्ट आणि प्रेम यांसारख्या मराठी चित्रपटाची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.