मुंबई : चित्रपटाशी निगडीत वाद जितका जास्त तितकी त्याला प्रसिद्धी अधिक मिळते.
अनेक चित्रपटांना याचा फायदा मिळतो. सध्या पद्मावतीला वाढता विरोध पाहता त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता ऑनलाईन माध्यमातून चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
युट्युबवर पद्मावती फूल मुव्ही याला खूप सर्च आहे. आणि असे टाईप केल्यानंतर एक व्हिडिओदेखील दिसतो. या व्हिडिओची सुरूवात भंसाळी प्रोडक्शनच्या लोगोने होते. त्यामुळे अनेकांना असे वाटते की हा खरंच पद्मावतीचा पायरेटेड मुव्ही आहे का ? पण हा व्हिडिओ फेक आहे.
पद्मावतीच्या या फेक मुव्ही व्हिडियोला युट्युबवर सहा लाखांहून अधिक व्ह्युज आहेत. त्यामुळे वाद असला तरीही रसिकांना या चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिक आहे.
पद्मावतीच्या दोन्ही गाण्यांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तसेच या चित्रपटाच्या ट्रेलरनेही युट्युबवर धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटाचा वाद कसा मिटतोय आणि चित्रपट कधी रिलीज होणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या 'पद्मावती' चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रमुख भूमिकेत आहे. सोबतच शाहीद कपूर आणि रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.