Oppenheimer box office collection : एका हॉलिवूडपटाचीच (Hollywood Movie) चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरुये. बरं, ही चर्चाही इतक्या मोठ्या स्तरावर सुरुये की तुमची इच्छा असूनही त्यापासून सुटका होणं कठीणच. सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्म म्हणू नका किंवा मग इथंतिथं सुरु असणाऱ्या अनेकांच्याच गप्पा म्हणू नका. 'ओपेनहायमर' हा एकच विषय सर्वांच्या नजरा वळवत आहे. खरंतर हे एका व्यक्तीचं नाव, पण इथं चर्चा रंगलीये ती म्हणजे 'ओपेनहायमर' चित्रपटाची.
हॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलानच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटानं जागतिक स्तरावर प्रदर्शनापूर्वीच कमालीची लोकप्रियता मिळवलीये. खास बाब म्हणजे स्टारकास्ट असो किंवा आणखी तांत्रिक बाबी, प्रेक्षकांना चित्रपचाबद्दल जाणून घ्यायला कमालीची उत्सुकता आहे.
हा चित्रपट त्याच्या कथानकासोबतच आणखी एका कारणानं खास आहे, ते कारण म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेला कॅमेरा. निर्माते आणि दिग्दर्शकांच्या सांगण्यानुसार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आयमॅक्स कॅमेराचा वापर करण्यात आला आहे.
'ओपेनहायमर' हा चित्रपट भौतिकशास्त्रज्ञ आणि अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या आयुष्यावर बेतला आहे. ज्याच्या चित्रीकरणासाठी IMAX तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. IMAX कॅमेरानं चित्रीत केलेले चित्रपट आणि तुम्ही IMAX थिएटरमध्ये पाहता त्या चित्रपटांमध्ये नेमका फरक जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम 2022 च्या Nope या चित्रपटापर्यंत जावं लागतं. या कॅमेरानं चित्रीत झालेला हा एक उत्तम सिनेमा.
डच-स्वीडिश सिनेमोटोग्राफर Hoyte van Hoytema यांनी त्या चित्रपटाचं छायांकन केलं होतं. Oppenheimer साठीही त्यांचीच वर्णी लागली. आयमॅक्स कॅमेरामध्ये चित्रीत करण्यात आलेल्या या चित्रपटांना तुम्ही आयमॅक्स सिनेमागृहांमध्येच पाहिल्यास त्याचा आनंद द्विगुणित होईल. त्यामुळं Oppenheimer चा अनुभव IMAX स्क्रीनमध्येच घ्या.
आयमॅक्स हे एक आधुनिक तंत्रज्ञान असून, यामाध्यमातून चित्रपटांमध्ये 70mm पर्यंत बारकावे टीपता येतात. 1967 मध्ये स्थापन झालेल्या आयमॅक्स कॉर्पोरेशनकडूनच या तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. तांत्रिक शब्दांत हे तंत्र Image MAXimum। म्हणून ओळखलं जातं.
सर्वसामान्य थिएटरच्या तुलनेत आयमॅक्समध्ये तुम्हाला Wide Screen आणि अफलातून Sound चा अनुभव घेता येतो. हायटेक स्पीकर्समुळं तुम्ही या चित्रपटाचाच एक भाग आहात असं तुम्हासला भासतं. थोडक्यात चित्रपट पडद्यावर सुरु असता तरीही तुम्हीही त्यातच आहात असा दर्जेदार अनुभव आयमॅक्समधून मिळतो. भारतामध्ये एसएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाचं चित्रीकरण आयमॅक्स कॅमेरानं करण्यात आलं होतं. त्यापूर्वी बरीच वर्षे आधी, यशराज फिल्म्स या निर्मितीसंस्थेअंतर्गत साकारण्यात आलेल्या 'धूम 3' या चित्रपटाची निर्मिती आयमॅक्स Format मध्ये करण्यात आली होती.