Onkar Bhojane : 'तुझी तुलाच पुरी करायची....', ओंकार भोजनेचा 'तो' Video Viral

Onkar Bhojane Viral Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजने प्रसिद्धीच्या झोतात आला असून सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर पुन्हा चर्चेत आला आहे. 

Updated: Feb 22, 2023, 01:04 PM IST
Onkar Bhojane : 'तुझी तुलाच पुरी करायची....', ओंकार भोजनेचा 'तो' Video Viral    title=
Onkar Bhojane Viral Video

Onkar Bhojane Viral Video: छोट्या पडद्यावर विनोदाच्या अफलातून टायमिंगनं सर्वांना हसवणारा कोकण कोहिनूर अर्थात अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) प्रसिद्धीच्या झोतात आला. ओंकारने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या शो मधून प्रसिद्धी मिळवलेल्या ओंकारने ‘फू बाई फू’ (Fu Bai Fu) या कार्यक्रमामधूनही प्रेक्षकांना पोट धरु हसायला भाग पाडलं. सध्या ओंकारचा एक व्हिडीओ (Video Viral) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडीओमध्ये ओंकार कविता म्हणताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Satyajeet Tambe (@satyajeettambe)

पुन्हा ओंकार सोशल मीडीयावर चर्चेत आला असून या व्हायरल व्हिडिओत ओंकार (omkar bhojane poem) कविता म्हणताना दिसत आहे. तो आपल्या दमदार आवाजात ओंकारनं “तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची” ही कविता गातोय. त्याच्या गाण्यावर प्रेक्षक टाळ्या आणि शिट्यांच्या आवाजात दाद देतांना दिसताय. 

वाचा: उर्फी जावेदचं सर्व सामना चोरीला, आता ती कपडे....,घडला विचित्र प्रकार! 

ओंकारच्या याच व्हिडिओची आता अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe ) यांना देखील भुरळ पडली आहे. नुसती भुरळ नाही तर त्यांनी ओंकारचा हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाला शेअर करत त्याचे कौतुक केलं आहे. या व्हिडीओला त्यांनी “तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची…कमाल गायलंस मित्रा, ओंकार भोजने !” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर ओंकारच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात ओंकारने ही कविता सादर केली होती.