Subi Suresh passes away : दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ एक दु:खद बातम्या समोर आल्या. त्यातच आता मल्याळम इंडस्ट्रीतील कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट सुबी सुरेश (Subi Suresh passes away) हिचं वयाच्या अवघ्या 41 वर्षी निधन झालं. मिळालेल्या माहिती नुसार यकृताशी संबंधित आजाराने ती ग्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरु होते. आज म्हणजेच 22 फेब्रुवारी रोजी सकाळी कोची येथील एका खासगी रुग्णालयात सुबीनं अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच, एसके भगवान आणि मायलसामी यांच्याशिवाय, ज्युनियर एनटीआरचा चुलत भाऊ तारक रत्न मारला गेला. या सततच्या धक्क्यातून साऊथ फिल्म इंडस्ट्रीही सावरू शकली नव्हती की आता सुबी सुरेशच्या रूपाने आणखी एक जोरदार धक्का बसला आहे.
वाचा: उर्फी जावेदचं सर्व सामना चोरीला, आता ती कपडे....,घडला विचित्र प्रकार!
डान्सर म्हणून सुबी सुरेशने (Subi Suresh passes away) आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती स्टेज शोमध्ये कॉमेडी करू लागली. तिच्या एव्हरग्रीन कॉमेडी शोमधील तिच्या विनोदी पात्रांसाठी सुबी सुरेश ही लोकप्रिय होती. तिच्या विनोदी शैलीमुळं ती घराघरात प्रसिद्ध झाली. कॉमेडी शो बरोबरच ती चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये सक्रिय झाली आहे.
Actor Subi Suresh passed away. As a result of liver disease, she was receiving treatment at an Aluva private hospital. #subisuresh #ripsubisuresh #celebrity pic.twitter.com/FVEJR2Xai5
— Onmanorama (@Onmanorama) February 22, 2023
ठकसारा लहाला, 'गृहथन' आणि 'ड्रामा' यांसारख्या चित्रपटांमध्ये सुबी सुरेशचे चांगलेच कौतुक झाले. तिच्या विनोदी आवाजाचे लोक कौतुक करत होते. चित्रपटांसोबतच तिने अनेक टीव्ही शो देखील केले आणि ती होस्ट देखील होती. सुबी सरेशही तिच्या फिटनेसबद्दल खूप जागरूक होती आणि ती अनेकदा तिचे वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असे.
'सिनेमाला' या कॉमेडी शोमुळे सुबी सुरेश हे घराघरात पोहोचली. ती शेवटची मुलांच्या कुट्टी पट्टलम शोमध्ये दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, सुबी सुरेशचे वडील दुकान चालवतात तर आई गृहिणी आहे. सुबी सुरेशने लग्न केले नाही. पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाशीही बोलली नाही.
फेब्रुवारी 2023 मध्ये, आत्तापर्यंत साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील 8 सेलिब्रिटींनी या जगाचा निरोप घेतला आहे. यामध्ये वाणी जयराम, तारका रत्न, टीपी गजेंद्रन, के विश्वनाथ, मायलसामी, एसके भगवान, चित्रपट संपादक श्री जी जी कृष्ण राव आणि आता सुबी सुरेश यांच्या नावांचा समावेश आहे.