Aryan Khan मागोमाग शाहरुखच्या आणखी एका खास व्यक्तीवर गंभीर आरोप

आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांचा कारावासातील मुक्काम वाढतच चालला आहे

Updated: Oct 26, 2021, 04:49 PM IST
Aryan Khan मागोमाग शाहरुखच्या आणखी एका खास व्यक्तीवर गंभीर आरोप  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : ड्रग्ज केस प्रकरणी एनसीबीनं ताब्यात घेतलेल्या बॉलिवूड अभिनेता Shah Rukh Khan याचा मुलगा आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांचा कारावासातील मुक्काम वाढतच चालला आहे. ज्यानंतर आता आर्यनला सोडवण्यासाठी शाहरुखनं वकिलांची फौज कामाला लावली आहे. 

दरम्यान एकिकडे शाहरुखचा मुलगा अडचणींमध्ये असतानाच तिथं आता त्याच्या गटातील आणखी एका खास व्यक्तीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

एनसीबीकडून करण्यात आलेला दावा पाहता, आर्यन खान प्रकरणाचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिच्यावर आरोप करण्यात आले आहेत. 

तपास सुरु असतानाच त्यामध्ये जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत. 23 ऑक्टोबरला प्रभाकरच्या वक्तव्यानं तपास भरकटवण्यात आल्याची बाब अधिक स्पष्ट होत आहे, असा दावा एनसीबीनं केला आहे. 

सदर प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ठ आहे आणि त्याबाबतचा कोणताही पुरावा जाहीर करण्यात आलेला नाही. तरीही माध्यमांमध्ये मात्र हे पुरावे पोहोचले आहेत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

संपूर्ण प्रकरणामध्ये पूजा ददलानीचं नाव समोर येत आहे, जिचा या प्रकरणाशी आणि शाहरुखशी थेट संपर्क येत आहे. त्यामुळं आता शाहरुखपुढे आणखी एक अडथळा उभा राहिल्याचं दिसत आहे.