मानसी नाईकचा बोल्ड अंदाज; अभिनेत्री म्हणतेय 'लावा फोन चार्जिंगला''

 एकविरा म्युझिक प्रस्तुत 'लावण्यवती'  या अल्बममधील 'गणराया' आणि 'करा ऊस मोठा' या दोन गाण्यांनंतर आता 'लावा फोन चार्जिंगला' ही ठसकेबाज  लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सर्वांनाच ठेका धरायला लावणाऱ्या 'लावण्यवती' च्या गाण्यांमध्ये 'लावा फ़ोन चार्जिंगला' या अजून एक ठसकेदार लावणीचा समावेश झाला आहे. 

Updated: Nov 13, 2023, 04:56 PM IST
मानसी नाईकचा बोल्ड अंदाज;  अभिनेत्री म्हणतेय 'लावा फोन चार्जिंगला'' title=

मुंबई : एकविरा म्युझिक प्रस्तुत 'लावण्यवती'  या अल्बममधील 'गणराया' आणि 'करा ऊस मोठा' या दोन गाण्यांनंतर आता 'लावा फोन चार्जिंगला' ही ठसकेबाज  लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सर्वांनाच ठेका धरायला लावणाऱ्या 'लावण्यवती' च्या गाण्यांमध्ये 'लावा फ़ोन चार्जिंगला' या अजून एक ठसकेदार लावणीचा समावेश झाला आहे. नुकताच या लावणीचा टीझर प्रदर्शित झाला असून टीझरवर मिळालेला प्रतिसाद पाहून प्रेक्षक या तिसऱ्या लावणीसाठी उत्सुक होते. 'लावा फोन चार्जिंग'ला या फक्क्ड लावणीला नवोदित गायिका प्रियांका चौधरीचा जबरदस्त आवाज लाभला आहे. 

महाराष्ट्राची लाडकी मेनका, जिच्या नृत्य आणि अदाकारीवर अख्खा महाराष्ट्र फिदा आहे त्या मानसी नाईकच्या नखरेल अदाकारीने या लावणीला चारचांद लावले आहेत. गाण्याचे दिग्दर्शन व नृत्य दिग्दर्शन 'सुंदरीकार' आशिष पाटील यांचे असून 'रॉकस्टार' अवधूत गुप्तेंचे शब्द आणि स्वररचना आहे. या सर्वांच्या कलेने ही 'लावण्यवती' बहरली आहे. 

'लावण्यवती' अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, ''लावण्यवती'तील पहिल्या दोन लावण्या संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरल्या. आता ही तिसरी बहारदार लावणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मानसी नाईकने आपल्या नजाकतीने तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. आता या लावणीने तिच्या चाहत्यांमध्ये अधिकच भर पडणार आहे. खूप धमाकेदार अशी ही लावणी आहे.''

मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ (Baghtoy Rikshawala), ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली. मानसी नाईक नेहमीच तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. आता पुन्हा एका मानसी तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे. 

काही दिवसांपुर्वी मराठी अभिनेत्री मानसी नाईकने पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेतला. बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लूक प्रमाणे ही अभिनेत्री सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.  सोशल मीडियावर चाहत्यांच्य संपर्कात राहण्यासाठी मानसी नेमहीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते.