मुंबई : सिनेमांत खलनायक ते कॉमेडी आणि गंभीर भूमिकांपर्यंत मनोज बाजपेयी यांनी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज मनोज बाजपेयी चित्रपटसृष्टीचा एक ओळखीचा चेहरा असला तरी त्याचा इथपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. मनोजचा जन्म १९६९मध्ये पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नरकटियागंजमधील बेलवा या छोट्याशा गावात झाला. मनोज बाजपेयीने आयुष्यात खूप संघर्ष केला. आजकाल मनोज बाजपेयींची 'द फॅमिली मॅन' ही वेब सिरीज बरीच चर्चेत आहे. दरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान मनोजने त्याच्या वैयक्तिक आयुष्या संबंधित अनेक खुलासे केले आहेत.
मनोज बाजपेयी म्हणाला की, ''मी आणि शाहरुख खान एक बिडी शेअर करायचो. शाहरुख खान एकमेव असा व्यक्ती होता जो मारुती व्हॅनमधून येत असे. त्याच्याकडे लाल रंगाची मारुती व्हॅन होती. शाहरुखमुळेच मी पहिल्यांदा दिल्लीच्या ताजमध्ये असलेल्या डिस्कोमध्ये जाऊ शकलो.'
मनोज बाजपेयींनी जुने किस्से आठवत म्हणाला की, 'शाहरुखनेच मला दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये एका डिस्कोमध्ये नेले होते. तो पुढे म्हणाला, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही ऐकमेकांना भेटलो. आम्ही बर्याच गोष्टी एकत्र शेअर करायचो. बिडी, सिगारेट किंवा आम्हाला परवडेल अशा सगळ्याच गोष्टी. मनोज किंग खानचं वर्णन करत म्हणाला की, शाहरुखची पर्सनॅलिटी अतिशय मोहक आहे. तो महिलांमध्ये खूप लोकप्रिय असायचा.
विशेष म्हणजे मनोज बाजपेयी आणि शाहरुख खान यांनी यश चोप्राच्या 'वीर-झारा' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. 2004च्या मनोज बाजपेयीने प्रीती झिंटाच्या सिनेमात मंगेतरची भूमिका साकारली होती.
मनोज बाजपेयी लवकरच 'द फॅमिली मॅन 2' मध्ये दिसणार आहे. ही वेब सीरिज लवकरच रिलीज होणार आहे. तर दुसरीकडे शाहरुख लवकरच 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे. शाहरुखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांत भूमिकेत असणार आहेत.
शाहरुखचा आधी रिलीज झालेला 'झिरो' बॉक्सऑफिसवर फ्लॉप झाला होता. तेव्हापासून तो कोणत्याही सिनेमांत दिसला नव्हता. झिरोच्या अपयशानंतर शाहरुख बराच विचार करुन प्रोजेक्ट निवडत आहे