कान्स फेस्टिव्हलमध्ये पिंजऱ्यात कैद झाली मल्लिका शेरावत...

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१८ मध्ये बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आपला जलवा दाखवला.

Updated: May 16, 2018, 12:19 PM IST
कान्स फेस्टिव्हलमध्ये पिंजऱ्यात कैद झाली मल्लिका शेरावत... title=

मुंबई : कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१८ मध्ये बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आपला जलवा दाखवला. कंगणा रानौत, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर यांची रेड कार्पेटवरची जादू काहीशी लक्षवेधी ठरली. पण यावेळी बॉलिवूडची हॉट बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावतने ही कान्स फेस्टिव्हलमध्ये वर्णी लावली. त्यादरम्यानचा एक व्हिडिओ मल्लिकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत ती पिंजऱ्यात कैद आहे आणि सपोर्ट करण्याची विनंती करत आहे. ही विनंती नसून हा जगभरातील लोकांसाठी संदेश आहे.

मल्लिकाने लॉक मी अप या कॅम्पेनमध्ये सहभागी होत चाईल्ड ट्रॅफिकिंग आणि प्रोस्टिट्य़ूशन विरोधात आवाज उठवला आहे. या गंभीर प्रश्नावर जगभरातील लोकांचे लक्ष वेधण्याची ही उत्तम संधी तिने साधली. मल्लिका ‘फ्री अ गर्ल इंडिया इंटरनॅशनल’या स्वयंसेवी संस्थेची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे. ही संस्था मानव तस्करी आणि मुलांवर होत असलेल्या लैंगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम करते.

मल्लिकाने स्वतःला १२ बाय ८ च्या पिंजऱ्यात कैद केले असून पहा ती काय म्हणतेय....

 

मल्लिका म्हणते की, कान्समध्ये हे माझे नववे वर्ष आहे आणि हे फेस्टिव्हल केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील बाल वेश्यावृत्तीविरोधात आवाज उठविण्यासाठी सर्वांत उत्तम व्यासपीठ आहे. एका पिंजऱ्यात स्वत:ला कैद करून मी याविषयीची कल्पना करू इच्छित होती की, कशाप्रकारे तरुण मुलींची तस्करी केली जात आहे. ती कशापद्धतीने १२ बाय ८ फुटाच्या पिंजऱ्यात फसली आहे. या निर्दोष मुलांना कुठल्याही मदत आणि आधाराविना जगावे लागते. कुठल्याही बदलाची आणि मदतीची अपेक्षा न करता या तरुणींना कशाप्रकारे प्रत्येक मिनिटाला गैरव्यवहाराचा सामना करावा लागतो. त्यामुळेच मी माझ्या वाट्याला आलेली जबाबदारी पार पाडण्याची आणि याविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक असा मुद्दा आहे, ज्याचा लवकरात लवकर समूळ नाश करण्याची गरज आहे.