Vijay Deverakonda on Boycott Laal Singh Chaddha trend: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा त्याचा आगामी चित्रपट 'लाइगर' मुळे चर्चेत आहे. बॉयकॉट बॉलिवूडच्या ट्रेंडमध्ये, विजयचा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विजयनं चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या ट्रेंडबद्दल वक्यव्य केलं आहे.
IndiaToday.in ला विजयनं नुकतीच मुलाखत दिली होती. या मुलाखतीत विजयला बॉयकॉट ट्रेंडवर विचारण्यात आले होते. यावेळी विजय खुलेपणाने बोलला, 'मला वाटतं की चित्रपटाच्या सेटवर अभिनेते, दिग्दर्शक, अभिनेत्री यांच्याशिवाय इतरही अनेक महत्त्वाचे लोक आहेत. एका चित्रपटात 200-300 कलाकार काम करतात आणि आमच्या सर्वांचे स्टाफ मेंबर्सही असतात. त्यामुळे एक चित्रपट अनेकांना रोजगार देतो. बऱ्याच लोकांसाठी जगण्याचे हे एक साधन आहे.
पुढे विजय म्हणाला, 'जेव्हा आमिर खान सरांनी 'लाल सिंह चड्ढा' बनवला तेव्हा त्यांचे नाव चित्रपटातील स्टार म्हणून पुढे आले होते, परंतु या चित्रपटाशी 2 ते 3 हजार कुटुंबे जोडलेली आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे ठरवता तेव्हा त्याचा केवळ आमिर खानवरच परिणाम होत नाही, तर हजारो लोकांवर त्याचा परिणाम होतो, जे रोजगार गमावतात.'
विजय पुढे म्हणाले, 'आमिर सर एक अशी व्यक्ती आहे जी लोकांना थिएटरकडे खेचते. हा बहिष्कार का होत आहे हे मला माहित नाही. पण याला जे काही गैरसमज कारणीभूत आहेत, ते समजून घ्या की याचा एकट्या आमिर खानवर परिणाम होत नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.'
बॉयकॉट ट्रेंडचा आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटावर वाईट परिणाम झाला आहे. चांगल्या रिव्ह्यूनंतरही चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीत, अनेक शोला प्रेक्षक नाहीत, त्यामुळे चित्रपटाचे सकाळचे शो रद्द करावे लागले आहेत.
आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल
'लाल सिंह चड्ढा' हॉलिवूडची क्लासिक चित्रपट 'फॉरेस्ट गम्प' चा ऑफिशिअल हिंदी रीमेक आहे. चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. मोना सिंहनं आमिरच्या आईची भूमिता साकारली आहे, तर दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.