KBC 16 Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपति 16' चे सुत्रसंचालन करत आहे. या शोच्या प्रत्येक एपिसोडची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत असतात. यावेळी अमिताभ हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकांशी गप्पा मारत त्यांच्यासोबत हा एपिसोड रंगवताना दिसतात. अमिताभ यांच्याशी बोलताना स्वत: स्पर्धक अनेक खुलासे करतात तर त्यासोबतच अमिताभ देखील त्यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. यावेळी एका स्पर्धक महिलेनं तिचा धाकटा मुलगा हा अंधरूनावरून उठू शकत नाही याविषयी सांगितलं तर ती सगळी परिस्थिती ऐकताच अमिताभ यांनी त्यांना भावूक होत मदत करणार असल्याचे म्हटले आहे.
अमिताभ बच्चन यांना स्पर्धक शालिनी शर्मा यांच्याशी बोलत असताना कळलं की त्या दिल्लीहून अनवाणी आल्या आहेत. त्यावेळी शालिनी यांनी त्यांची एक भावूक होणारी गोष्ट सांगितली की त्यांचा धाकटा मुलगा हा 18 वर्षांचा आहे आणि तो अंथरूनात आहे. दिवसेंदिवस त्याची अवस्था ही खराब होते. तो ठीक होईल याची काही हमी नाही. त्यामुळे आता सगळं काही फक्त एका आशेवर अवलंबून आहे.
शालिनी यांनी पुढे सांगितलं की त्यांचा मुलगा हा 1 महिन्याच्या बाळासारखा आहे. जन्मापासूनच तो बेशुद्ध आहे आणि त्याला आकडी येते. योग्यवेळी त्याच्यावर उपचार होऊ शकला नाही. 2 वर्षांनंतर त्याला जाणवलं की त्याला काय झालं आहे.
सुरुवातीला त्यांच्या मुलाला 30-40 वेळा आकडी यायची. 2009 मध्ये जेव्हा चिन्मयची हिप डिस्लोकेशन सर्जरी करावी लागली, सर्जरीनंतर तो अंथरुनावरच असतो. त्यानं फक्त 3 महिने चांगलं आयुष्य जगलं. भावूक होतं शालिनी यांनी अमिताभ यांना सांगितलं की 'त्यांच्या डोळ्यांना होणारा त्रास हा मी व्यक्त करु शकत नाही.'
शालिनीनं गेममध्ये 25 लाख रुपये जिंकले. तेव्हा अमिताभ बच्चन यांना सांगितलं की 'जेव्हा मी प्रेग्नंट होते, तेव्हा माझा मोठा मुलगा हा 2 वर्षांचा होता. कॉम्प्लीकेशन्समुळे माझ्या दुसऱ्याचा मुलाचा जन्म हा वेळेच्या आधीच झाला. त्याचं वजन तेव्हा फक्त 1.75 किलो होतं. इतकंच नाही तर त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याला योग्य ती ट्रीटमेंट मिळाली नाही.'
एका आईला असलेलं हे दु:ख अमिताभ पाहू शकले नाही त्यांना देखील हे सगळं ऐकल्यानंतर अश्रू अनावर झाले. त्यानंतर बिग बी शालिनी यांना मदत करण्यासाठी हात पुढे केला आणि म्हणाले, 'तुम्ही त्याचे रिपोर्ट्स मला द्याल. मी माझ्या काही ओळखीच्या डॉक्टरांना विचारेन की काही होऊ शकतं का?'