मुंबई : बीग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऋतिक रोशन यांचा 'कभी खुशी कभी गम' हा सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल... या सिनेमात आणखीन एका छोट्या अभिनेत्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं...
हा छोटा अभिनेता म्हणजे सिनेमात काजोल-शाहरुखच्या मुलाची - 'क्रिश'ची भूमिका निभावणारा जिब्रान खान... पण, सिनेमातला छोटा जिब्रान आता छोटा राहिलेला नाही... जिब्रान गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड डेब्युच्या तयारीत आहे.
हाच जिब्रान लवकरच 'कभी खुशी कभी गम'चा दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी प्रोजेक्टचा भाग बनणार आहे... पण, अभिनेता म्हणून नव्हे...
करण जोहरच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाचं चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिब्राननं करण जोहरला एखाद्या भूमिकेसाठी विचारलं होतं... परंतु, अजून जिब्रानचा चेहरा मॅच्युअर दिसत नाही असं सांगून करननं त्याला भूमिका न देता चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याची ऑफर दिली.
'कभी खुशी कभी गम'नंतर करन जिब्रानचा मेंटर बनलाय. २२ वर्षांचा जिब्राननं मार्शल आर्टस, कथ्थक आणि घोडेस्वारीची ट्रेनिंग घेतलीय. शामक दावरच्या डान्स स्टुडिओमध्ये डान्स शिकल्यानंतर त्यानं ट्रेनर म्हणूनही काम पाहिलंय.
'ब्रह्मास्त्र'मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाला अगोदर 'ड्रॅगन' असं नाव देण्यात आलं होतं... तीन भागांत तयार होणारा या सिनेमाचा पहिला भाग १५ ऑगस्ट २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.