नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल

संमेलनाचे यंदाचे १००वे वर्ष आहे.   

Updated: Nov 20, 2019, 08:17 PM IST
नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल title=

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध सिनेनिर्माते, दिग्दर्शक, डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने निवड झाली आहे. अखील भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि मंगेश कदम यांनी ही केली घोषणा केली आहे. संमेलनाचे यंदाचे १००वे वर्ष आहे.  डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले.

अखील भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जब्बार पटेल आणि अभिनेते मोहन जोशी यांनी अर्ज केले होते. त्यानंतर झालेल्या नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीच्या चर्चेत जब्बार पटेल यांची एकमताने निवड झाली.

त्यानंतर १५ डिसेंबर २०१९ रोजी हेणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. यासंबंधतीत माहिती प्रसाद कांबळी आणि परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी दिली. 

जब्बार पटेल यांनी त्यांच्या कारकिर्दित अनेक नाटके आणि चित्रपटे दिग्दर्शित केलेत. त्याचप्रमाणे त्यांच्या अभिनयाने देखील चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. 'तुझे आहे तुजपाशी', 'माणूस नावाचे बेट', 'वेड्याचे घर उन्हात' या नाटकात त्यांनी कमालीची भूमिका साकारली.