'कभी-कभी' चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा मनोरंजक किस्सा, तुम्हाला माहितीये का?

कभी-कभी हा चित्रपट सर्वांनाच माहित आहे. पण या चित्रपटाबद्दल अमिताभ बच्चन यांनी एका शोमध्ये खूपच मनोरंजक गोष्ट सांगितली. त्यांनी 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगबद्दल एक खूलासा केला.

Intern | Updated: Dec 21, 2024, 06:11 PM IST
'कभी-कभी' चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा मनोरंजक किस्सा, तुम्हाला माहितीये का?  title=

अमिताभ बच्चन, ज्यांना हिंदी सिनेमा मध्ये 'महानायक' मानले जाते, त्यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्यातले एक महत्त्वाचे चित्रपट म्हणजे 'कभी कभी'. या चित्रपटात शशी कपूर आणि राखी यांनी अमिताभसोबत अभिनय केला होता. 'कभी कभी' हे चित्रपटाच्या गाण्यांसाठीही प्रचंड प्रसिद्ध आहे. 

अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सांगितले की, त्यांना 'कभी कभी' चित्रपटासाठी स्वतःच्या कपड्यांमध्येच शूटिंग करावे लागले होते. याचे कारण म्हणजे, या चित्रपटासाठी डिजायनर सूट उपलब्ध नव्हता.

अमिताभ बच्चन म्हणाले, 'दीवार' चित्रपटाचे शूटिंग सुरू होते आणि तो चित्रपट अ‍ॅक्शन, फाइट सीन आणि इंटेन्स ड्रामा असलेला होता. तो चित्रपट पूर्ण केल्यानंतर, मला दोन दिवसांनी 'कभी कभी'च्या शूटिंगसाठी काश्मीरला जावे लागले. 'कभी कभी' हा रोमँटिक चित्रपट होता, ज्यात सुंदर फुलं, टेकड्यांवरील थंडगार वारे आणि एक शांतीपूर्ण वातावरण होते. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांचा हा अनुभव मला विचित्र वाटला.'

अमिताभ पुढे म्हणाले, 'दीवार' पूर्ण केल्यानंतर, 'कभी कभी'च्या पोशाखाबद्दल मी यश चोप्रासोबत चर्चा केली. मी त्यांना विचारले, 'या चित्रपटात मी काय घालावे?' त्यांचा उत्तर होते, 'तुझ्याकडे जे काही आहे तेच घाल, ते सर्व चांगले दिसेल.' आणि म्हणूनच, चित्रपटात मी जे कपडे घालले आहेत, ते माझ्या स्वतःच्या कपाटातील होते.

'दीवार' चित्रपटाच्या यशानंतर, अमिताभ आणि यश चोप्रा यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 'कभी कभी' हा त्यांचा दुसरा चित्रपट होता. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. 'दीवार' त्याच्या अ‍ॅक्शन आणि ड्रामासाठी प्रसिद्ध आहे, तर 'कभी कभी' एक कल्ट क्लासिक बनला आहे. त्याच्या गाण्यांची जादू आजही रसिकांच्या मनात आहे.

अमिताभ यांच्या अभिनयाने या चित्रपटांना खूपच प्रचंड यश मिळवून दिले आणि 'कभी कभी' आजही सर्वकालिक प्रेम कथा म्हणून ओळखला जातो.