Gujuuben: चमचमीत गुजराथी पदार्थ बनवून वयाच्या 78 व्या वर्षी 'उर्मिला बा' कशा बनल्या सोशल मीडिया स्टार?

Urmila Jamnadas Asher: गुजराथी पदार्थ आपल्याला सर्वांनाच आवडतात. त्यातील अनेक पदार्थ हे आपल्या परिचयाचे आहेत. तर काही पदार्थांची आपल्याला कोणतीच ओळख नाही. हल्ली युट्यूबवरून आपल्याला याची सर्व माहिती घेता येते.

Updated: Jan 19, 2023, 06:36 PM IST
Gujuuben: चमचमीत गुजराथी पदार्थ बनवून वयाच्या 78 व्या वर्षी 'उर्मिला बा' कशा बनल्या सोशल मीडिया स्टार?  title=

Urmila Jamnadas Asher: गुजराथी पदार्थ आपल्याला सर्वांनाच आवडतात. त्यातील अनेक पदार्थ हे आपल्या परिचयाचे आहेत. तर काही पदार्थांची आपल्याला कोणतीच ओळख नाही. हल्ली युट्यूबवरून आपल्याला याची सर्व माहिती घेता येते. ते पदार्थ आपल्या युट्यूब व्हिडीओज (Gujrathi Food on Social Media) पाहून घरीही तयार करू शकतो. आजकाल अनेक फूड ब्लॉग्स, व्हिलॉग्स हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असेच काही व्हिडीओ व्हायरल होतात आणि हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आजीबाईं या वयाच्या 77 व्या सोशल मीडिया स्टार झाल्या आहेत आणि त्या युट्यूबवर फक्त गुजराथी पदार्थ करून दाखवतात आणि त्यातही नव्या पदार्थाची अगदी आत्मविश्वासानं सांगतात. सध्या त्यांचे हे व्हिडीओज सोशल मीडियावर (Social Media Urmila Baa) तूफान व्हायरल होत आहेत. (inspiring story of youtuber urmila jamnadas asher who makes gujrathi food at the age of 77 after loosing three children goes viral on social media)

युट्यूबवर त्यांनी लॉकडाऊनच्या काळात आपल्या नातवासह हर्षसोबत (You Tube Channel) युट्यूब चॅनल सुरू केले. त्यांनी हळूहळू गुजराथी पदार्थांनी लोकांना तोंडओळख करू देण्यास सुरूवात केली त्यानंतर त्यांच्य व्हिडीओजच खूप चांगला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर त्यांनी मात्र मग मागे फिरून पाहिले नाही. त्यांनी 2020 साली सुरू केलेल्या या युट्यूब चॅनलचे आज लाखो सबस्क्राबर्स आहेत. त्याचसोबत त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. त्याचबरोबर त्यांना अनेक ठिकाणी मुलाखतीसाठीही बोलावले जाते. 

सध्या त्यांनी नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी नुकत्याच सुरू झालेल्या मास्टर शेफ इंडियामध्ये (Master Chef India) सहभाग घेतला असल्याचे सांगितले. त्यांच्यासमवेत अनेक मोठेही शेफही सहभागी झाले आहेत. उर्मिला जमनादास आशेर असे त्यांचे संपुर्ण नावं आहे. त्यांना ्प्रेमानं उर्मिला बा असंही म्हणतात. गुज्जू बेन का नाश्ता असं त्याच्या युट्यूब चॅनलचे नावंं आहे. 

उर्मिला यांच्या आयुष्यात अनेक वादळं आली आहेत. त्याच्या तीनही मुलांचे लहान वयातच निधन झाले. एकाचे असेच लहानपणी निधन झाले तर दुसऱ्याचेही गंभीर आजारनं निधन झाले. त्यांच्या तिसऱ्या मुलीचे इमारतीच्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या पतीचेही अचानक निधन झाले होते. परंतु यातून हार न मानता त्यांनी पुढे जायचा निर्णय घेतला आणि आज त्यांनी स्वत:च्या शैलीनं खाद्यक्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यांनी त्यांच्या खाद्यपदार्थांचा ब्रॅण्डही सुरू केला आहे. त्यांचे पदार्थ हे ऑनलाईनही विकले जातात. त्याचसोबत त्यांनी लोणचीही विकलायला सुरूवात केली होती. त्यांच्या लोणच्यांच्या (Pickles) बरणीवर त्यांचा फोटो असलेला त्यांचा ब्रॅण्डही आहे.