भलीमोठी कास्ट तरी...; पहिल्या दिवसाच्या कमाईत 'वॉर'ला पाठी टाकू शकला नाही हृतिकचा 'फायटर'

Fighter Box Office Collection Day 1: हृतिक रोशनच्या 'फायटर'नं बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 26, 2024, 11:42 AM IST
भलीमोठी कास्ट तरी...; पहिल्या दिवसाच्या कमाईत 'वॉर'ला पाठी टाकू शकला नाही हृतिकचा 'फायटर' title=
(Photo Credit : Social Media)

Fighter Box Office Collection Day 1: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा फायटर काल प्रदर्शित झाला. समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत अनेकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. फायटरमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या अॅक्शची सगळ्यांनीच स्तुती केली आहे. फायटरच्या आगाऊ बूकिंगला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता अशात हृतिकच्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती समोर आली आहे. 

sacnilk नुसार हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या 'फायटर' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 25 कोटी कमाई केली आहे. दरम्यान, या आकड्यात बदल होण्याची शक्यता आहे. कारण अधिकृत आकडे अजून समोर आलेले नाही. त्यामुळे फायटरची ओपनिंग हृतिक रोशनच्या वॉर आणि बॅन्ग बॅन्ग पेक्षा कमी आहे. 'वॉर'नं पहिल्याच दिवशी 53 कोटीची ओपनिंग केली होती. तर बॅन्ग बॅन्गनं पहिल्या दिवशी 27 कोटी रुपये कमावले होते. फायटरआधी सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण'चे दिग्दर्शन केले होते. त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ओपनिंग केली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरुमध्ये फायटर चित्रपटाच्या तिकिटांची किंमत खूप जास्त आहे. दिल्लीमध्ये पीव्हीआर सेलेक्ट सिटी वॉक (गोल्ड) मध्ये यावेळी फायटरचं एक तिकिट 2200 रुपयांचं आहे. तर पीव्हीआर दिग्दर्शक कट एंबियंस मॉलमध्ये संध्याकाळच्या शोच्या तिकिटाची किंमत ही 2400 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गुरुग्राममध्ये पीव्हीआर दिग्दर्शक कट एम्बियन्स मॉलमध्ये तिकिटांची किंमत 2300 रुपयांपासून सुरु होऊन 2400 रुपयांपर्यंत आहे. तर बोलायचे झाले तर कोलकातामध्ये आयनॉक्स केस्ट मॉलचं सगळ्यात महागडं तिकिट हे 1780 रुपये आहे. तर आयनॉक्स साउथ सिटीचं तिकिट 1770 रुपयांचं आहे. 

प्रजासत्ताक दिनाची होऊ शकतो फायदा

प्रजासत्ताक दिना निमित्तानं चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशीच्या आगाऊ बूकिंगमध्येच 7.81 कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्ड ऑफ माउथ आणि प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्याची आशा सगळ्यांनाच आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाची सर्वत्र स्तुती होत आहे. हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.