दोन वर्षांनंतर शेवटी कोणी हृतिकच्या Ex wife ला गाठलं?

सुझैन खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करून माहिती दिली आहे.

Updated: Jan 11, 2022, 02:40 PM IST
दोन वर्षांनंतर शेवटी कोणी हृतिकच्या Ex wife ला गाठलं? title=

मुंबई : हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खानला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. ओमायक्रॉन माझ्या इम्यून सिस्टममध्ये घुसला आहे सुझैन खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करून या व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली. सुझैन खानने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'कोरोनाला 2 वर्षे चकवा दिल्यानंतर, तिसऱ्या वर्षी 2022 मध्ये, शेवटी माझ्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. मी काल रात्री कोविड पॉझिटिव्ह आले. कृपया सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या. हे खूप संसर्गजन्य आहे.

चाहते चिंतेत 
सुजैन खानची तब्येत बरी नसल्याची माहिती मिळताच तिचे चाहते आणि सेलिब्रिटी ती लवकरात लवकर बरी होण्यासाठी सतत पोस्ट करत आहेत आणि प्रार्थना करत आहेत. अली गोनीने कमेंटमध्ये लिहिलं- 'लवकर बरी हो.' बिपाशा बसूनेही कमेंटमध्ये  लिहिलं - 'लवकर बरी हो.' त्याचबरोबर अभिनेत्री नीलम कोठारीने कमेंटमध्ये लिहिलं - 'सुजी काळजी घे.' यासोबत प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीने कमेंटमध्ये लिहिलं - 'सुजैन काळजी घ्या.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुझान अर्सलानला डेट करत आहे?
काही दिवसांपूर्वी अनुष्का रंजनने सोशल मीडियावर अर्सलान गोनीच्या वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. ज्यामध्ये सुजैन खान अर्सलान गोनीसोबत दिसली होती. स्वत: सुझैननेही अर्सलान गोनीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती अर्सलानसोबत ब्लॅक टॉप आणि गोल्डन मिनी स्कर्टमध्ये पोज देताना दिसली होती. हा फोटो शेअर करत सुझैनने अर्सलानच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्टही लिहिली होती.