भयंकर! 23 वर्षीय सेलिब्रिटीची हत्या, शरीरावर आढळल्या अनेक जखमा

झगमगत्या विश्वात कधी काय होईल सांगता येत नाही.   

Updated: Jul 4, 2022, 11:29 AM IST
भयंकर! 23 वर्षीय सेलिब्रिटीची हत्या, शरीरावर आढळल्या अनेक जखमा title=

मुंबई : झगमगत्या विश्वात कधी काय होईल सांगता येत नाही. आता देखील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हाँगकाँगमधील इंटरनेट सेलिब्रिटी आणि योगा इन्स्ट्रक्टर चाऊ वाई-यिन हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. चाऊ वाई-यिनच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी पोलिसांना मोठे यश मिळाले. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक देखील केली आहे. अटक करण्यात आलेला तरुण पीडितेचा एक्स बॉयफ्रेंड असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

चाऊ वाई-यिनचा मृतदेह  गुरुवारी रात्री 10 वाजल्यानंतर कोलून वेस्टमधील रिट्झ कार्लटन हॉटेलमधील एका खोलीत आढळून आला. चाऊ वाई-यिन बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या आईने दिली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. 

Yoga Trainer Murder: 23 साल की इंटरनेट सेलिब्रिटी और योग ट्रेनर का मर्डर, बाथटब में बॉडी पर मिले चाकू के 30 निशान

चाऊ वाई-यिनचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला. फॉरेन्सिक अहवालात पीडितेच्या शरीरावर समोरून आणि मागून 30 पेक्षा जास्त वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. तिच्या शरीरावर अनेक जखमा देखील आढळून आल्या आहेत. मृतदेह सापडण्याच्या 24 तास आधी पीडितेची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. 

याप्रकरणी गुरुवारी रात्री वोंग ताई सिन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपासानंतर पोलिसांनी 28 वर्षीय संशयित तरुणाला अटक केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या पूर्वनियोजित असू शकते.

पोलिसांना घटनास्थळावरून 22 सेमी लांबीचा चाकूही सापडला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं. पीडितेचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर  पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.