Marvel सुपरहिरोच्या पत्नीचा सेटवर लैंगिक छळ; सीन कट झाल्यानंतरही Kiss करत राहिला, व्हॅनमध्ये मर्यादा सोडली…

Entertainment News : चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रणयदृश्यांसाठी सहसा इंटिमसी कोऑर्डिनेटरचं मार्गदर्शन घेतलं जातं. पण, एका हॉलिवूडपटादरम्यान मात्र अभिनेत्रीला भयावह अनुभवाचा सामना करावा लागला...   

सायली पाटील | Updated: Dec 27, 2024, 03:40 PM IST
Marvel सुपरहिरोच्या पत्नीचा सेटवर लैंगिक छळ; सीन कट झाल्यानंतरही Kiss करत राहिला, व्हॅनमध्ये मर्यादा सोडली… title=
hollywood justin baldonis and black lively sexual harrasment charges allegation on it ends with us star

Entertainment News : हॉलिवूड वर्तुळात सध्या एका गंभीर प्रकरणाची चर्चा सुरू असून, या प्रकरणाचे पडसाद जगभरात उमटताना दिसत आहेत. जागतिक मनोरंजन विश्वामध्ये सध्या याच प्रकरणाची चर्चा सुरू असून, हॉलिवूड अभिनेत्री आणि 'मार्वल' अभिनेता रायन रेनॉल्ड्सची पत्नी असणाऱ्या फेम ब्लेक लाइवलीनं 'इट एंड्स विद अस'मधील सहकलाकार जस्टिन बाल्डोनीवर लैंगिक अत्याचारांचा गंभीर आरोप केला आहे. 

अभिनेत्रीनं केलेल्या या गंभीर आरोपांनंतर टॅलेन्ट एजन्सीनं त्याला थेट बाहेरचा रस्ता दाखवला असून, या अभिनेत्याकडून एक पुरस्कारही परत घेण्यात आला आहे. या अभिनेत्रीनं नेमकं अभिनेत्यावर आरोप करत नेमकं काय म्हटलं? पाहा... 

ब्लेक लाइवलीनं तक्रारीमध्ये नेमकं काय म्हटलं? 

जवळपास 80 पानांच्या तक्रारपत्रामध्ये अभिनेता - दिग्दर्शकावर कैक आरोप लावल्यामुळं सबंध हॉलिवूडला हादरा बसला. ब्लेक लाइवलीनं अभिनेत्यावर आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला. इतक्यावरच न थांबता तिनं या अभिनेत्याची अवहेलना करण्यासाठीचं कम्पेनही सुरू करण्याचं आवाहन केलं. लाईवलीनं बाल्डोनी, वेफेरर स्टुडिओ आणि कंपनीचे सीईओ जेमी हेथ यांच्यावर गंभीर आरोप केले. 

80 पानांच्या तक्कारपत्रामध्ये अभिनेत्रीनं कोणते आरोप केले? 

- ब्लेक तिच्या वजनावरून बाल्डोनीसमोर त्याच्या व्हॅनिटीमध्ये भावूक होऊ रडत होती. 
- सीन कट होऊनही बाल्डोनी ब्लेकला किस करतच राहिलेला. 
- लाईवलीच्या परवानगीशिवायच बाल्डोनीनं चित्रपटामध्ये काही इंटिमेट सीन जोडले होते. यावेळी सेटवर कोणीही कोऑर्डिनेटर नव्हता इतकंच नव्हे, तर किसींग सीनमध्ये वारंवार बदल करण्यात आले. 
- बाल्डोनीनं लाईवलीवर अर्वाच्य भाषेत लैंगिक टीप्पणी केली आणि लाईवलीची नग्नावस्थेतील छायाचित्र आपल्या पत्नीसमवेत इतर महिलांनाही दाखवली. 
- बाल्डोनीनं असाही दावा केला की तो लाईवलीच्या मृत वडिलांसमवेत संवाद साधू शकतो. 

हेसुद्धा वाचा : अरे बापरे! हा इतका फिट कसा? -20 अंशांच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत Cristiano Ronaldo चं स्विमिंग, पाहा Video 

आरोप प्रत्यारोपांच्या या सत्रामध्ये आता हा लढा न्यायालयापर्यंत पोहोचला असून, यामध्ये दोन्ही कलाकारांनी आपल्या परिनं आपली बाजू मांडली असून, बाल्डोनीच्या वकिलांनी लाईवलीनं लावलेले हे सर्व आरोप फेटाळले आहेत.