Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

Guess Who :  या फोटोतील चिमुकला बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता बनला आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमात त्याने काम केले आहे. तसेच बॉक्स ऑफिसवर (Box Office) त्याचे पिक्चर बक्कळ कमाई करतायत. या अभिनेत्याला तुम्हाला ओळखायचे आहे. 

Updated: Feb 2, 2023, 02:08 PM IST
Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?  title=

Guess Who :  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखायचा आहे.  

फोटोत काय?

हा फोटो बॉलिवूड अभिनेत्याचा (Bollywood Actor) लहानपणीचा फोटो आहे. या फोटोत चिमुकला स़्ट्रॉने ज्सूस पिताना दिसत आहे. फोटोत तो खुपच सुंदर दिसत आहे. हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. या फोटोतील चिमुकला बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता बनला आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमात त्याने काम केले आहे. तसेच बॉक्स ऑफिसवर (Box Office) त्याचे पिक्चर बक्कळ कमाई करतायत. या अभिनेत्याला तुम्हाला ओळखायचे आहे. 

हा अभिनेता बॉलिवूडचा (Bollywood Actor) रोमॅंटीक हिरो आहे. तो बादशाह आणि किंग खान या नावाने बॉलिवूडमध्ये ओळखला जातो. बॉलिवूडच्या अनेक सिनेमात त्याने काम केले आहे. सध्या नुकताच रिलीज झालेला त्याचा पठाण (pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या अभिनेत्याला तुम्हाला ओळखता येतेय का पाहा. 

'हा' आहे अभिनेता?

जर तुम्ही अजूनही या अभिनेत्याला ओळखलं नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो, हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा बादशाह, किंग खान शाहरूख खान (shah rukh khan) आहे. सध्या शाहरूखचा पठाण (pathaan) चित्रपट खुपच चर्चेत आहे. त्याचा पठाण चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. या बक्कळ कमाईद्वारे तो अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करतोय. 

शाहरुख (shah rukh khan) आज 6000 कोटींचा मालक आहे. शाहरुखच्या संघर्षाप्रमाणेच त्याची गौरीसोबतची प्रेमकहाणीही संघर्षमय होती. गौरीच्या कुटूंबियांना लग्नासाठी राजी करण्यासाठी त्याला खुप मेहनत घ्यावी लागली होती. शाहरुख गौरीच्या मागे मुंबईत देखील आला होता, तेव्हा त्याच्या खिशात फारच कमी पैसे होते. गौरीच्या शोधात त्याने अनेक रात्री रस्त्यावर काढल्या होत्या. शाहरुख मुंबईत आला तेव्हा त्याचा कॅमेरा त्याच्यासोबत होता. पण जेव्हा सर्व पैसे खर्च झाले, तेव्हा त्याला आपला कॅमेरा देखील विकावा लागला. अखेर शाहरुखला गौरी मिळाली आणि मग दोघांचे लग्न झाले होते.

सध्या शाहरूख खान पठाण (pathaan) चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.