घरभरणसाठी चापूनचोपून साडी नेसत Beauty Queen ची कमाल, पाहिली का ती 'पापा की परी'

मुलगी असावी तर अशी....   

Updated: Aug 10, 2022, 10:10 AM IST
घरभरणसाठी चापूनचोपून साडी नेसत Beauty Queen ची कमाल, पाहिली का ती 'पापा की परी' title=

मुंबई : आज 21 व्या शतकात देखील अनेक जण मुली म्हणजे काचेचं भांड असल्याचं समजतात, तर मुलींसाठी काहींचे विचार फक्त चूल आणि मूल एवढ्यासाठीच मर्यादित असतात. पण मुली देखील त्यांच्या जीवनात यशाच्या शिखरावर पोहचू शकतात आणि आई-वडील, कुटुंबाच नाव मोठं करू शकतात. आता पर्यंत अनेक महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करुन दाखवलं आहे. अशाच प्रेरणादायी महिलांपैकी एक म्हणजे मान्या सिंह. 

Femina Miss India 2020 ची विजेती मान्याने आई-वडिलांचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. रिक्षा चालवून कुटुंबाची भुक भागवणाऱ्या आई-वडिलांसाठी मान्याने मुंबईत घर घेतलं आहे. मान्याने अनेक वर्षांचं वडिलाचं स्वप्न पूर्ण केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मान्याने तिच्या नव्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. एका व्हिडीओमध्ये मान्याचे वडील भावुक होताना दिसले, तर आईच्या चेहऱ्यावरील आनंदाबद्दल शब्द देखील अपूरे पडतील.. पाहा लाल साडीतील मान्याचे काही खास फोटो

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मान्या सिंह ही उत्तर प्रदेशच्या रिक्षा चालकाची मुलगी आहे. तिच्यासाठी हा विजय विशेष आहे. दिवसरात्र एक करुन तिने मेहनत केली. त्याचेच हे फळ असल्याचे ती म्हणाली. Manya Singh यश मिळवल्यानंतर आपल्या संघर्षाची कहाणी सोशल मीडियावर शेअर केलीय. `ThisIsMyStory` च्या माध्यमातून तिने आपली कहाणी सर्वांसमोर मांडली. 

Manya Singh म्हणते, तिच्या आईवडीलांनी मान्याच्या परीक्षेसाठी लहानमोठे दागिने गहाण ठेवले होते. कुशीनगरमध्ये जन्माला आलेली मान्या म्हणते, खूप कठीण काळात मी लहानाची मोठी झाले. रिकामी पोटी अनेक दिवस काढले. काही रुपये वाचवण्यासाठी कित्येक किलोमीटर पायी प्रवास केला. 

आज मान्यावर आई-वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहे. मान्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःबद्दल सर्व माहिती चाहत्यांना देत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.