प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य म्हणाली, 'माझ्या मुलाचा बाप कोण हे एक मोठं गुपितच...'

आई बनण्याची बाब बऱ्याच दिवसांपासून लपवून ठेवल्यानंतर अभिनेत्रीने एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत

Updated: Jul 5, 2022, 03:57 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य म्हणाली, 'माझ्या मुलाचा बाप कोण हे एक मोठं गुपितच...' title=

मुंबई : आई बनण्याची बाब बऱ्याच दिवसांपासून लपवून ठेवल्यानंतर अभिनेत्रीने एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. एक धक्कादायक खुलासा करत अभिनेत्री  म्हणाली की, तिला मुलगाही आहे. तो अमेरेकी नागरिक आहे. पण मुलाच्या वडिलांबद्दल विचारलं असता अभिनेत्री म्हणाली की, हे कायम लोकांसाठी एक रहस्यच राहील. याचबरोबर ती आपल्या शरीरावरील शस्त्रक्रियेबद्दलही उघडपणे बोलली आणि तिने हे सगळं केवळ पुरुषांना आकर्षित करण्यासाठी केलं नसल्याचही तिने सांगितलं.

घानाची अभिनेत्री किसा जिबेकलने पहिल्यांदाच तिच्या गरोदरपणाबद्दल उघडपणं सांगितलं आहे. याआधीही तिने प्रत्येकवेळी तिला मूल झाल्याचं जाहीरपणे नाकारलं आहे. पण आता तिने एका शोदरम्यान कबुली दिली आहे की ती एका मुलाची आई देखील आहे. मात्र, वडिलांबाबत सांगण्यास तिने नकार दिला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान किसा जिबेकलने खुलासा केला आहे की, तिचं मूल अमेरिकेत आहे. तिची ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. तिनं सांगितलं की, ती गरोदरपणात भावाला भेटण्यासाठी अमेरिकेला गेली होती. पँडॅमिकमुळे प्रतिबंध करण्यात आले होते.  आणि ती मुलाला जन्म देण्यासाठी  घानाला परत येऊ शकली नाही.

जिबेकलने सांगितलं की, बाळाचा जन्म अमेरिकेत झाल्यामुळे तिचं मूल अमेरिकेचं नागरिक झालं. जिबेकलला मुलाच्या वडिलांबाबत विचारलं असता, ते लोकांसाठी गुपित राहील, असं सांगितलं.

किसा जिबेकल बॉडी सर्जरीबद्दलही खूप चर्चेत होती. असा दावा केला जात होता की, तिने श्रीमंत पुरुषांना आकर्षित करण्यासाठी आपल्या शरीराचा आकार वाढवला होता. मात्र मुलाखतीदरम्यान तिने या गोष्टीना नकार दिला आहे. 

केवळ पुरुषांना आकर्षित करण्यासाठी तिने हे सर्व केले नसल्याचं जिबेकलने सांगितलं. ती म्हणाली की, मुलाला जन्म दिल्यानंतर तिला तिच्या शरीरात काही बरं वाटत नव्हतं. तिला तिचं पुर्वीचं शरीर मिळावं म्हणून तिने शस्त्रक्रिया करून घेतली.

जिबेकल म्हणाली की, तिचा विश्वास आहे की, तिचं शरीर मौल्यवान आहे आणि ते फक्त पैसे असलेल्या पुरुषांसाठी आहे. पण तिला पुरुषांशी संबंधित सर्व काही समजलं आहे. त्यामुळे आता तिला पुरुषांची गरज नाही.

आपण लेस्बियन नसल्याचंही तिने म्हटलं आहे. त्यामुळे आपल्याला फक्त स्त्रियांमध्येच रस आहे. असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी हा समज आपल्या मनातून काढून टाकावा.