मुंबई : आजकाल लोक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाण्यापेक्षा घरीच सिरीज पाहणं पसंत करतात. हल्ली सिरीज पाहण्याची मोठी क्रेझ आहे. घराबाहेर पडण्याऐवजी लोक आता घरी बसून काही सिरीज बघतात. या सिरीजमुळे रातोरात अनेक कलाकार स्टार बनले आहेत.
OTT प्लॅटफॉर्मवरील सीरिज कुटुंबासोबत पाहण्यासाठी अनेकदा योग्य नसतात. पण अशा काही सीरिज आहेत ज्या तुम्ही कुटुंबासह पाहू शकता. तुम्हालाही वीकेंडला तुमच्या कुटुंबासोबत सिरीजचा आनंद घ्यायचा असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी काही सर्वोत्तम सिरीजची यादी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूया या यादीमध्ये कोणत्या सिरीज आहेत. जे तुम्ही तुमच्या कुटुंबासह पाहू शकता आणि तुमच्या वीकेंडचा आनंद घेऊ शकता.
ये मेरी फॅमिली
या यादीत पहिलं नाव आहे ये मेरी फॅमिली: तुम्ही ही वेब सीरिज तुमच्या कुटुंबासोबत देखील पाहू शकता. कुटुंबासोबत पाहण्यासाठी ही एक उत्तम वेब सिरीज आहे. ही सीरिज तुम्हाला TVF Play, Netflix आणि YouTube वर पाहायला मिळेल. ही सीरिज ९० च्या दशकावर आधारित आहे. ही सीरिज पाहिल्यानंतर ९० च्या दशकातील मुलं बरंच काही रिलेट करू शकतील.
पंचायत
सीरिज पंचायत. ही एक उत्तम सीरिज आहे. जी तुम्हाला OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर बघायला मिळेल. या सीरिजमध्ये नीना गुप्ता, रघुवीर यादव आणि जितेंद्र कुमार यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. ही सीरिज कॉमेडी, ड्रामा, मसाल्याने भरलेली आहे. तुम्हाला जर तुमच्या कुटुंबासोबत सिरीज बघायची असेल, तर तुमच्यासाठी पंचायत हा एक चांगला पर्याय आहे.
गुल्लक
या यादीतील पुढचं नाव आहे गुल्लक या वेबसीरिजचं. गुलक ही सीरिज एक उत्तम फॅमिली ड्रामा आहे. या सिरीजमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचं अतिशय सुंदर चित्रण करण्यात आलं आहे. मध्यमवर्गीय कुटुंबं या मालिकेशी खूप काही जोडू शकतील. ही वेब सिरीज सोनी लाईव्हवर उपलब्ध आहे.
होम
आम्ही तुम्हाला सांगतो की, होम वेब सीरीज कुटुंबासोबत पाहण्यासाठी देखील एक चांगला पर्याय आहे. ही वेब सिरीज फिलींग्स आणि प्रेमाने भरलेली आहे. कुटुंब आणि शेजाऱ्यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ही सिरीज Alt Balaji वर उपलब्ध आहे. ही वेबसिरीज तुम्ही जरूर पहा.
द आम आदमी फॅमिली
तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत काही चांगला कंटेंट पाहायचा असेल तर आम आदमी फॅमिली हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. या सिरीजमध्येही मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीचं अतिशय सुंदर चित्रण करण्यात आलं आहे. या सिरीजमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा संघर्ष आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची त्यांची सवय अतिशय सोप्या पद्धतीने चित्रित करण्यात आली आहे. तुम्हाला ही सिरीज खूप आवडेल. ही सिरीज यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता.