Esha Gupta तिच्या 'नो मेकअप लूक'मुळे चर्चेत...फोटो व्हायरल

कायम हॉट लूकमध्ये दिसणाऱ्या Esha Gupta चा  'नो मेकअप लूक' पाहाताचं तुम्हालाही बसेल धक्का

Updated: Jun 1, 2022, 03:59 PM IST
Esha Gupta तिच्या 'नो मेकअप लूक'मुळे चर्चेत...फोटो व्हायरल title=

मुंबईः बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी कमी चित्रपट केले मात्र तरीही आज त्या नेहमी चर्चेत असतात. या काही अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ईशा गुप्ता. कमी चित्रपट करूनही ईशा गुप्ता नेहमीच चर्चेत असते.बॉलीवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींमध्येही तिचा समावेश होतो, ईशा तिच्या फोटोंमुळे सर्वत्र खळबळ उडवून देते.

ईशा गुप्ता बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर तितकीच सक्रिय असते. नुकताचं ईशाने इंस्टाग्रामवर एक अत्यंत बोल्ड फोटो शेअर केला आहे. ईशाचा पाळीव प्राण्यासोबत फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कायम हॉट आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसणाऱ्या ईशाने आता चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा मेकअप न करता फोटो शेअर केला आहे. इन्स्टग्रामवर फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'आपण ब्रूनोबद्दल काहीही बोलू शकत नाही...' असं लिहिलं आहे.

ईशाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती सध्या 'आश्रम 3' वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये तिचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.  सीरिजमध्ये ईशा बाबा निरालासोबत इंटिमेट होताना दिसणार आहे. सीरिजमध्ये बाबा निरालाच्या भूमिकेत अभिनेता बॉबी देओल झळकणार आहे.