मुंबई : झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. या कार्यक्रमाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या शोमधील स्क्रिप्ट, त्यांच्या वेशभूषा त्यांच्या कॉमेडी टाईमिंगने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तर या कार्यक्रमातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागलं. या शोची लोकप्रियता इतकी आहे की, या शोमधील डायलॉग्सवर अनेक रिल्स रिक्रिएट केले जायचे. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालन डॉ निलेश साबळे करत होता. मात्र आत नुकतंच या अभिनेत्याने हा शोडल्याची माहिती समोर येतेय. यामागाचं कारण म्हणजे अभिनेत्याची प्रकृती असल्याचं समजतंय.
नुकतीच एबीपीला दिलेल्या मुलाखतीमध्ये निलेश साबळे म्हणाला,'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष सुरू आहे. हा शो खूप लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मी भाग होतो, याचा मला प्रचंड अभिमान आहे. प्रेक्षकांनी जे काही प्रेम केलंय, करत आहेत आणि करत राहतील, त्या सगळ्या प्रेक्षकांचं मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी इतकी वर्ष आम्हाला हा कार्यक्रम करू दिला. आमच्या सगळ्याला टीमला इतकं डोक्यावर घेतलं. मी मनापासून या सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानतो.
काही कारणास्तव या कार्यक्रमाचा भाग नसेन. गेल्या आठवड्यापासूनच मी या शोमधून बाहेर पडलोय. याच कारण एकमेव होतं, ज्या काही मला नवीन गोष्टी करायच्या होत्या. एक सिनेमाचं काम सुरू आहे. वेबसीरिजचं पण काम चालू आहे. तसंच थोड्या तब्येतीच्या तक्रारिही वाढल्या आहेत. या कारणास्तव मी शोमधून बाहेर पडलो आहे. प्रेक्षकांना हसवण्याचं काम परमेश्वराने आपल्या सर्वांना शिकवलंय, असं मला वाटत. त्यांनी हे दिलं म्हणूनच आपण लोकांना हसवतोय. तर लोकांना आयुष्यभर हसवतं राहणारच आहे.
एका कार्यक्रमातून जरी एक्झिट झाली असली तरी नवीन काहीतरी घेऊन तुमच्यासमोर नक्की येईन. मग सिनेमा असेल, नाटक असेल, यातलं काहीही असू शकतं. डोक्यात बऱ्याच गोष्टी आहेत. पण ठोस नसल्यामुळे तुमच्याशी शेअर करू शकत नाही. एवढं मात्र निश्चित आहे, जे तुम्ही अनुभवलं होतं, त्याहीपेक्षा वेगळं आणि खास नक्कीच तुमच्यासाठी आणेन. निश्चित, त्याचंच काम चालू आहे. लोकांना जी उत्सुकता आहे, ती मी थोडीशी ताणून पण धरेन. माझं पु्न्हा एकदा हेच म्हणणं आहे, ज्या कार्यक्रमाने मला इतक्या सगळ्या गोष्टी दिल्या.
हा पहिला असा कार्यक्रम आहे, जो १० वर्ष चालला. याचा वेगळा एक रेकॉर्ड आहे. त्यामुळे या कार्यक्रमाने ज्या गोष्टी मला दिल्या त्यासाठी आयुष्यभर ऋणी राहिन. कार्यक्रमातील सगळ्या कलाकारांनी जे आजपर्यंत सहकार्य केलं होतं, त्याचंही मनापासून आभार मानतो.'' असं निलेश साबळे दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला. सध्या या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन अभिनेत्री श्रेया बुगडे करत आहे.