Nimbooda Nimbooda Song Meaning : बॉलिवूड चित्रपटांमधली गाणी ही आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. गाणं प्रदर्शित झालं की सगळीकडे त्याच गाण्याची चर्चा असते. जवळपास सगळेच ते गाणं गुणगुणताना दिसतात. इतकंच नाही तर आता सोशल मीडियामुळे सगळ्यांच्या रिल्समध्ये देखील तिच गाणी आपण पाहत असतो. मात्र, काही गाणी अशी आहेत जी आजही प्रेक्षकांमध्ये इतक्या वर्षांनंतर देखील लक्षात आहेत. असंच एक गाणं आहे ज्याची आजही चर्चा रंगते. ते गाणं म्हणजे निमुडा निमुडा. हे गाणं 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील आहे. या गाण्यात ऐश्वर्या रायनं उत्तम डान्स केला आहे. पण तुम्हाला निमुडा निमुडा गाण्याचा अर्थ माहित आहे का? चला तर आज त्याविषयी जाणून घेणार आहोत.
निमु़डा निमुडा हे राजस्थानचं लोकगीत आहे. गाजी खान मनियार यांनी 1982 मध्ये सगळ्यात आधी हेच गाणं गायलं. त्यानंतर मंगनियार समाज हे गाणं गाऊ लागलं. मामे खान हे मंगनियार समाजाचे होते. त्याचं चौधरी हे गाणं लोकांच्या हृदयावर राज्य करतं. निमुडा निमुडा फक्त गाणं नाही तर एक भावना आहे. हे गाणं नुकत्याच लग्न बंधनात अडकलेल्या नवरी आणि तिच्या नवऱ्यासाठी आहे. या गाण्यातून बायको ही तिच्या नवऱ्याकडे हीरे मागताना दिसते. मला चंद्र तारे नको मला फक्त निमुडा (लिंबू द्या).
तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नव विवाहीत मुलगी लिंबू का मागते. असं म्हटलं जातं की अनेक वर्षांपूर्वी लिंबू संत्रीसारख्या गोष्टी राजस्थानमध्ये सहजा-सहजी मिळत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या नवऱ्याकडे लिंबूची मागणी करत हे गाणं बनवलं होतं. या गाण्याला यूट्यूबवर 132 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. कविता कृष्णमूर्ति आणि करसन सरगठिया यांनी हे गाणं गायलं आहे.
हेही वाचा : 'माझी अल्लू अर्जुनशी तुलना करु नका'; Allu Arjun सोबतच्या तुलनेवर बिग बींचं वक्तव्य
1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात हे गाणं सगळ्यांनी ऐकलं. या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर त्यात सलमान खान आणि अजय देवगन सारखे कलाकार पाहायला मिळाले. आज बॉलिवूडमधील लोकप्रिय ठरलेल्या गाण्यांमध्ये हे एक आहे. या गाण्यातील सलमान आणि ऐश्वर्याच्या केमिस्ट्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.