'माझी अल्लू अर्जुनशी तुलना करु नका'; Allu Arjun सोबतच्या तुलनेवर बिग बींचं वक्तव्य

Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये स्पर्धकाशी तुलना करताच अमिताभ बच्चन यांनी तसं करु नका असं म्हणत काय सांगितलं पाहा... 

दिक्षा पाटील | Updated: Dec 27, 2024, 03:42 PM IST
'माझी अल्लू अर्जुनशी तुलना करु नका'; Allu Arjun सोबतच्या तुलनेवर बिग बींचं वक्तव्य title=
(Photo Credit : Social Media)

Amitabh Bachchan : गेल्या बऱ्याच दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा त्याच्या 'पुष्पा 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सगळ्यात 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये एका स्पर्धकानं अल्लू अर्जुनचा उल्लेख केला. तर अमिताभ बच्चन म्हणाले त्याच्याशी माझी तुलना करू नका. या एपिसोडमध्ये कोलकाताची गृहिणी रजनी बरनीवाल या हॉटसीटवर होत्या. त्यांनी अमिताभ बच्चन आणि अल्लू अर्जुनची स्तुती केली. दरम्यान, नेमकं असं काय झालं की बिग बींनी अल्लू अर्जुनसोबत तुलना करू नका असं म्हटलं. 

अल्लू अर्जुनची स्तुती ऐकत आणि त्यानंतर त्याच्याशी होणारी तुलना पाहता अमिताभ बच्चन म्हणाले त्यांना ते पटलं नाही. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही रागात ते असं म्हणाले नाही तर अल्लू अर्जुनच्या प्रतिभेची स्तुती करत अमिताभ असं म्हणाले. याशिवाय ज्यांनी 'पुष्पा 2 द रुल' पाहिला नाही त्यांना पाहण्याचा सल्ला बिग बींनी दिला. यावर रजनी या म्हणाल्या, "सर मी अल्लू अर्जुन आणि तुमची खूप मोठी चाहती आहे." त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले, "माझं नाव जोडल्यानं काही फरक पडणार नाही. तर अल्लू अर्जुनची स्तुती करत ते म्हणाले की अल्लू अर्जुन एक अतिशय प्रतिभावान असलेला कलाकार आहे आणि त्याला जी ओळख मिळाली आहे. ती योग्य आहे. मी देखील त्याचा मोठा चाहता आहे. नुकताच त्याचा 'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि जर तुम्ही अजून हा चित्रपट पाहिला नसेल तर तुम्ही तो पाहायला हवा. पण तुम्ही त्याच्याशी माझी तुलना करु नका."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

स्पर्धक रजनीनं त्यावर म्हटलं की "दोन्ही कलाकारांमध्ये समानता आहे. तुम्हा दोघांची एन्ट्री ही अविश्वसनीय आहे आणि तुमच्यातील स्कील काही प्रमाणेत एकसारखे आहेत. जेव्हा तुम्ही कॉमेडी सीन करतात, तेव्हा तुम्ही दोघं तुमच्या कॉलरला पकडतात आणि डोळे मिचकवतात." 

हेही वाचा : सलमान खान जिच्यासोबत रिलेशनमध्ये त्याच मुलीला डेट करायचा 'हा' पत्रकार! मग...

हे ऐकताच अमिताभ बच्चन यांनी रजनी यांना विचारलं की "असा कोणता चित्रपट सांगा ज्यात त्यांनी असं केलं आहे." तर रजनी यांनी त्यांचा 1977 मध्ये प्रदर्शित झालेला अमर अकबर अ‍ॅनथनीचं नाव घेतलं आणि सांगितलं की "तुम्हा दोघांमध्ये आणखी एक गोष्ट समान म्हणजे तुमच्या दोघांच्या आवाजात एक वेगळीच समृद्धी आहे. तुम्हाला भेटून माझं एक स्वप्न पूर्ण झालं आता मला फक्त अल्लू अर्जुनला भेटायचं आहे."