दिव्या भारतीच्या वडिलांचं निधन; पतीने शेवटपर्यंत सोडली नाही साथ

पत्नीच्या निधनानंतरही तिच्या आई-वडिलांच्या संपर्कात होते साजीद नाडियाडवाला

Updated: Nov 1, 2021, 09:32 AM IST
दिव्या भारतीच्या वडिलांचं निधन; पतीने शेवटपर्यंत सोडली नाही साथ  title=

मुंबई : हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिव्या भारतीची जागा आज कलाविश्वात कोणीच घेऊ शकत नाही. असं म्हणायला काही हरकत नाही. 1993 साली दिव्याने आत्महत्या केली. कमी वर्षात दिव्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. आज दिव्या आपल्यात नाही. पण आजही तिच्या पतीला तिची आठवण येते. दिव्या भारती आणि साजीद नाडियाडवाला यांनी गुपचूप लग्न केलं. 

दिव्याच्या निधनानंतर साजिदने दुसरं लग्न केलं. पण आजही साजीद दिव्या भारतीच्या आई-वडिलांच्या संपर्कात आहे. रिपोर्टनुसार दिव्या भारतीचे वडील ओम प्रकाश भारती यांचं निधन झालं आहे. अशा कठीण प्रसंगी साजिदने तिच्या वडिलांची साथ शेवटपर्यंत दिली. ओम भारतीयांच्या अंतीमसंस्कारापर्यंत तो त्यांच्यासोबत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Trending Bollywood News, April 24: Sajid Nadiadwala Still Misses Divya  Bharti, Reveals His Wife Warda Nadiadwala in Emotional Interview | India.com

साजिदने दिव्याच्या आई-वडिलांना आपल्या आई-वडिलांप्रमाणेच वागवले. त्यांच्या प्रत्येक गरजांची तो काळजी घेतो. दिव्याचे वडील ओम प्रकाश भारती यांचे शनिवारी 30 ऑक्टोबर रोजी निधन झाले, तेव्हा साजिद नाडियादवाला त्याच्या सासरच्या जवळ होते.बॉलीवूडच्या एका सूत्राने सांगितले की, दिव्याचे निधन झाले तेव्हा साजीद तिच्या वडिलांच्या शेजारी होता. दुसऱ्या दिवशीच्या अंत्यसंस्कारालाही ते उपस्थित होता. 

दिव्या भारतीचा मृत्यू अजूनही लोकांसाठी एक रहस्य आहे. अभिनेत्रीने वयाच्या 16 व्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ती अल्पावधीतच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली.