Mukesh Chhabra Mother: आईला शेवटचा निरोप; दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांना अश्रू अनावर

Mukesh Chhabra Mother: सुशांत सिंग राजपुतचा शेवटच्या चित्रपटाचे म्हणजेच 'दिल बिचारा'चे दिग्दर्शक मुकेश छाब्रा (Mukesh Chhabra)  यांच्या आई कमला छाब्रा यांचे नुकतेच दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यविधीला बॉलिवूडच्या अनेक ज्येष्ठ मंडळींना (Mukesh Chhabra at Mother's Last Rites) हजेरी लावली होती. यावेळी मुकेश छाब्रा यांना त्यांचे अश्रू आवरताना आले नाहीत.

Updated: Apr 14, 2023, 02:30 PM IST
Mukesh Chhabra Mother: आईला शेवटचा निरोप; दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांना अश्रू अनावर title=
फाईल फोटो

Mukesh Chhabra Mother Passes Away: आपल्या आईला शेवटचा निरोप देणं हे कुणासाठीही फारच दुर्दैवाची गोष्ट असते. सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक मुकेश छाब्रा (Mukesh Chhabra Crying) यांच्या आईचे कमला छाब्रा यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या 70 व्या वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानं मुकेश छाब्रा यांच्यावर (Mukesh Chhabra Mother Age) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्रींच्या अंत्यविधीला बॉलीवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. यावेळी मुकेश यांना अश्रू अनावर झाले आहेत. मुकेश छाब्रा यांनी दिल बिचारा या बॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शक केले होते. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला होता. हा चित्रपट सुशांत सिंग राजपूतचा अखेरचा चित्रपट ठरला होता. मुकेश छाब्रा यांच्या मातोश्रींच्या अंत्यविधीचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरून समोर आले आहेत. 

'विरल भयानी'ने त्यांच्या ऑफिशियल इन्टाग्राम पेजवरून दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यामधील एका व्हिडीओ मुकेश हे खुर्चीवर बसलेले पाहायला मिळत आहेत परंतु मातृशोकामुळे त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यांचे सांत्वन करण्यासाठीही त्यांच्या आजूबाजूला (Bollywood Celebs consoles Mukesh Chhabra) त्यांच्या आप्त मंडळींनी हजेरी लावली होती. तर दुसऱ्या व्हिडीओतही त्यांना भेटायला आलेल्या मित्रपरिवार आणि आप्तेष्टांना ते मिठी मारताना दिसत आहेत आणि सगळेच त्यांचे सांत्वन करत त्यांच्या दु:खात सहभागी होत आहेत. (Dil bichara director mukesh chhabra mother passes away bollywood celebrity attends last rites)

मुकेश छाब्रा यांच्या आईचे आज ओशिवारा स्मशानभुमीत (Oshiwara) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावेळी दीपिका पादूकोण, नुपूर सेनन, फराह खान, अपारशक्ति खुराना हे सेलिब्रेटी मुकेश यांच्या मदतीला धावून आले. मुकेश छाब्रा यांच्या आई कमला छाब्रा यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून स्थिर नव्हती. त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते व त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू होते. अखेर त्यांच्या प्राणज्योत मावळली. आज 14 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता कोकिलाबेन रूग्णालयात (Kokilaben Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्यांच्या आईच्या निधनानंतर श्रद्धाजंली वाहिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राजकुमार राव, मृणाल ठाकूर, सान्या मल्होत्रा, प्रतीक गांधी, फातिमा सना शेख आदी लोकप्रिय कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. ते बॉलिवूडमध्ये कास्टिंग डिरेक्टर म्हणून ओळखले जातात. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन, कास्टिंग केले आहे. सध्या त्यांच्या आईच्या निधनानं बॉलिवूडमध्ये शोक व्यक्त केला जातो आहे. 'दिल बिचारा' (Dil Bichara) हा सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट त्यांनी डिरेक्ट केला होता. हा चित्रपट द फॉल्ट इन अवर स्टार्स या चित्रपटाचा रिमेक होता.