नैराश्याविषयीच्या सलमानच्या 'त्या' वक्तव्यावर दीपिकाचं प्रत्युत्तर

आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला दु:ख, संघर्ष, नैराश्य अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. 

Updated: Aug 6, 2019, 01:09 PM IST
नैराश्याविषयीच्या सलमानच्या 'त्या' वक्तव्यावर दीपिकाचं प्रत्युत्तर  title=

मुंबई : आजच्या स्पर्धेच्या जगात नैराश्याचा सामना प्रत्येक गरीब आणि श्रीमंत व्यक्तीला करावा लागतो. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानने नैराश्याविषयी असं वक्तव्य केलं जे अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या पचणी पडलं नाही. लोक अनेक वेळा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर जात असतात. पण काहींच्या खिशाला फिरायला जाण्याचा खर्च परडवणारा नसतो. अशात व्यक्ती फार दु:खी होतो. असं वक्तव्य सलमानने केलं होत. त्यानंतर तो म्हणाला 'जर ते फिरायला जाऊ नाही शकत, तर ते ज्या परिस्थित आहेत, त्यापासून त्यांना नुकसान पोहोचण्याची शक्यता असते.'

'पिंकव्हिला'च्या वृत्तानुसार, या गोष्टीवर दीपिका म्हणाली 'नैराश्यासह सुरू असलेल्या लढाईला फक्त एकच शब्द आहे आणि तो म्हणजे संघर्ष. नैराश्य एक अशी गोष्ट आहे जी नेहमी आयुष्यात फक्त संघर्षांचा सामना करायला लावते. मी देखील सतत संघर्षाचा सामना करताना थकायची.' 

आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला दु:ख, संघर्ष, नैराश्य अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. दीपिकाने खुद्द हे सगळं अनुभवलं आहे. त्यामुळे तिने 'द लाइव्ह लव्ह लाफ' नावाची संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून दीपिका अशा लोकांची मदत करते, जे नैराश्येमुळे खचले आहेत. अशा लोकांना सुखी आयुष्य जगण्याचा मंत्र या स्थंस्थेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न ती करत आहे.