‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्राला लागली मोठी लॉटरी, हा असेल अभिनेता!

‘दंगल’ या सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा आता पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Updated: Dec 2, 2017, 03:26 PM IST
‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्राला लागली मोठी लॉटरी, हा असेल अभिनेता! title=

मुंबई : ‘दंगल’ या सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा आता पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

‘दंगल’मध्ये गीता फोगाटच्या लहान बहिणीची भूमिका करून ती सर्वांच्याच नजरेत भरली होती. तिचं कामही चांगलंच पसंत करण्यात आलं होतं. त्यानंतर या अभिनेत्री काय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता सान्याला एक मोठा सिनेमा मिळाला आहे. या सिनेमात ती मुख्य भूमिका साकारणार आहे. 

हा असणार हिरो?

सान्या मल्होत्रा आगामी ‘बधाई हो’ सिनेमात बघायला मिळणार आहे. या सिनेमात आयुष्मान खुराणा मुख्य भूमिकेत असणार आहे. तर सान्या मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसेल. तर अमित शर्मा हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. अमित शर्माने याआधी अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हाच्या ‘तेवर’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 

रिलेट करणारी कथा

मीडिया रिपोर्ट्नुसार, हा एक टिपिकल इंडियन सिनेमा असणार आहे आणि कुणीही रिलेट करू शकेल अशी या सिनेमाची कथा असणार आहे. या सिनेमाचं शूटिंग जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. आता ही जोडी प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.