मुंबई : बॉलिवूड गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) ला जेव्हापासून कोरोना व्हायरसची लागण झाली हे कळलं तेव्हापासून लोकांमध्ये एक वेगळीच भीती निर्माण झाली. रिपोर्टनुसार, १५ मार्चला कनिका कपूरने लंडन ते लखनऊ असा प्रवास केला होता. तसंच एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने कनिका वॉशरूममध्ये लपल्याचं देखील दिसून आलं.
काही दिवसांपूर्वी कनिकाची लखनऊत कोरोनाची टेस्ट केली आणि ती टेस्ट पॉझिटीव्ह आली. मात्र त्यानंतरही कनिका अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेली दिसली. आता कनिकाशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. कनिकासोबत कल्पना टॉवरमधील ३५ रहिवाश्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. यामधील ११ लोकांची टेस्ट ही निगेटिव्ह आली असून २४ लोकांचे रिपोर्ट येणं अजून बाकी आहे.
कनिका कपूर आपल्या काकांसोबत या टॉवरमध्ये १३ मार्च रोजी राहिली होती. दुसऱ्यांदा कनिकाची कोरोना चाचणी करण्यात आणि आणि तिची ही चाचणी देखील पॉझिटीव्ह सिद्ध झाली आहे. कनिकाच्या कुटुंबियांना तिच्या आलेल्या रिपोर्टवर संशय व्यक्त केला होता.
Eleven of the 35 occupants of Kalpana Tower where #Bollywood singer #KanikaKapoor stayed with her uncle on March 13, have tested negative for #Coronavirus. The reports of 24 persons are awaited. #Covid19India #COVID19outbreak pic.twitter.com/CbWSi1PGhX
— IANS Tweets (@ians_india) March 24, 2020
त्या रिपोर्टमध्ये कनिकाचे वय २८ वर्षे व लिंग महिला ऐवजी पुरुष लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे या रिपोर्टवर तिच्या कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली होती. सध्या कनिकाची परिस्थिती स्थिर असल्याचं समजत आहे. गायिका kanika kapoor कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्याचं उघड होताच तिच्या संपर्कात आलेल्या संभाव्य व्यक्तींची यादी तयार करत त्यांची कोरोनासाठीची चाचणी करण्याची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागाने घेतली.
डीएनएने दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार कनिकासोबतच तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. लंडनवरून भारतात परतल्यानंतर तिने ३५ लोकांसोबत अधिक वेळ व्यतीत केला. त्यांपैकी ११ जणांचे रिपोर्ट नेगेटीव्ह आले आहेत, तर २४ जणांचे रिपोर्ट यायचे आहेत