अभिनेता शाहरुख खान हज यात्रेवर, सोशल मीडियावर व्हायरल होतोय Video

Shah Rukh Khan चे हज यात्रेचे व्हिडिओ आणि फोटोज होतायत व्हायरल, सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

Updated: Dec 1, 2022, 10:36 PM IST
अभिनेता शाहरुख खान हज यात्रेवर, सोशल मीडियावर व्हायरल होतोय Video title=

Shah Rukh Khan performing Umrah: बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान अर्थात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मक्का-मदीना (Makka Madina) इथला असल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमुळे शाहरुख खाने हज यात्रेसाठी पोहोचल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर शाहरुखच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. या व्हिडिओत शाहरुख खान पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. 

शाहरुख खानने केली हज यात्रा
शाहरुख खानचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून यात बॉलीवूड स्टार शाहरुख खान हज यात्रेसाठी मक्का-मदीनाला पोहोचला असं लिहिण्यात आलं आहे. दरम्यान, शाहरुख खानने याबाबत अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. शाहरुख आपला आगामी चित्रपट 'डंकी' च्या शुटिंगसाठी सध्या युएईमध्ये आहे. 

सौदी अरेबियात (Saudi Arabia) चित्रपटाचं शुटिंग पूर्ण केल्यानंतर शाहरुख खानने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत त्याने सौदी सरकारचं अभिनंदन केलं आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. सौदी अरेबियात आहेस तर हज यात्रा नक्की कर असं चाहत्यांनी शाहरुख खानला सुचवलं होतं.

हज यात्रेसाठी खास पोषाख
बॉलीवूड स्टार शाहरुख खान एका खास पोषाखात असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्याच्याबरोबर काही गार्डस असून शाहरुखने चेहऱ्यावर मास्क लावला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 'अल्लाह तुझी प्रार्थना स्विकार करो' अशी प्रतिक्रिया लोक देतायत. तसंच सोशल मीडियावर चाहते शाहरुख खानसाठी प्रार्थनाही करत आहेत.

चित्रपटाच्या शुटिंगसाठी सौदीत
शाहरुख खान याच्या आगामी डंकी या चित्रपटाचं शुटिंग सध्या सौदी अरेबियात सुरु आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर अभिनेत्री तापसी पन्नू  (Tapsee Pannu) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारीत शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.