VIDEO : 'आलिया भट्ट आणि तिच्या आईने देशाबाहेर जावं'

अभिनेत्रीची आगपाखड...... 

Updated: Apr 15, 2019, 10:39 PM IST
VIDEO : 'आलिया भट्ट आणि तिच्या आईने देशाबाहेर जावं' title=

मुंबई : लोकसभा निवडणूकांच्या धामधुमीच्या वातावरणात एकिकडे राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत अतसानाच कलाविश्वातही राजकीय वारे वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. मतदान करा असं आवाहन मतदारांना करण्यापासून, ते कोणाला मतदान करा ही बाब सांगण्यापर्यंत अनेक बाबतीत कलाकार मंडळी त्यांच्या भूमिका स्पष्ट करत आहेत. यातच अभिनेत्री पायल रोहातगी हिने सर्वांचच लक्ष वेधलं आहे. अभिनेत्री आलिया भट्ट हिची आई सोनी राजदान यांच्यावर निशाणा साधत पायलने त्यांच्यावर आगपाखड केली. 

'पायल रोहातगी ऍण्ड टीम' या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पायल मोठ्या आवेगाने भारतात कित्येक वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या ब्रिटीश मुस्लिम समुदायावर निशाणा साधताना दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वीच आलियाने आपल्याकडे भारतीय नागरिकत्व नसल्याचं एका मुलाखतीत स्पष्च केलं होतं. शिवाय, तिने मत न देता येण्यासंबंधी खंतही व्यक्त केली होती. त्याचनंतर पायलचा हा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओतून ती कलाविश्वाच्या एकंदर भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आलियाची आई, सोनी राजदान आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या वैवाहिक नात्याविषयीही तिने काही लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आला आहे. 

कलाविश्वात काम करणारी ही मंडळी खोटारडी आहेत, असं म्हणणाऱ्या पायलला तिच्या या वक्तव्याबद्दल  काही उत्तर मिळणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. आलिया आणि तिच्या आईवर आगपाखड करणाऱ्या पायलने जनतेने कोण त्यांच्या हिताविषयी बोलत आहे आणि कोण त्यांच्याविरोधात बोलत आहे, याचा विचार रावा असं आवाहनही केलं आहे.