प्रेग्नेंट असल्याच्या चर्चेवर अखेर बोलली बिपाशा

अनेक दिवसांपासून सिनेमांपासून दूर असलेली बिपाशा बसु पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 18, 2018, 01:56 PM IST
प्रेग्नेंट असल्याच्या चर्चेवर अखेर बोलली बिपाशा title=

मुंबई : अनेक दिवसांपासून सिनेमांपासून दूर असलेली बिपाशा बसु पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बिपाशा पुन्हा चर्चेत

अॅक्टर आणि पती करन सिंह ग्रोवर याच्यासोबत कॉन्डम अॅड केल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसींच्या चर्चा रंगत आहेत.

प्रेग्नेंसींवर बोलली बिपाशा

या चर्चा सुरु असतांनाचा बिपाशाने अखेर त्यावर ट्विट केलं आहे. बुधवारी रात्री बिपाशाने स्वत: याबाबत खुलासा केला आहे. ट्विटर हँडलवर पोस्ट करत तिने म्हटलं आहे की, 'मी कारमध्ये बसण्यापूर्वी बॅग माझ्या पोटाजवळ घेतली होती. सकाळी उठून बघते तर मी प्रग्नेंट होती. मीडियामध्ये माझ्या प्रेग्नेंसीच्या चुकीच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मी प्रेग्नेंट नाही आहे. हा चिड आणणारा शब्द आहे. शांत राहा. हे तेव्हाच होईल जेव्हा आम्हाला हवं.'

Amused yet again. I kept a bag on my lap while getting into my car and certain media ppl started my pregnancy speculation againGuys i am not pregnant .Kinda getting irritating Stay calm.. it will happen only when we want it

या आधीही होती चर्चेत

ही पहिली वेळ नव्हती. याआधी देखील तिच्या प्रेग्नेंसींच्या चर्चा रंगल्या होत्या. पती करन सिंह ग्रोवरसोबत ती मॅटरनिटी हॉस्पीटलमधून निघतांना तिला पाहिलं गेलं होतं. पण नंतर असं म्हटलं जात होतं की, करनच्या पोटात इन्फेक्शन होतं. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेलं होतं. पण खरं कारण अजूनही समोर आलेलं नाही.