Bipasha Basu Love Affairs: करण सिंग ग्रोवर अन् जॉन अब्राहमच्या आधी बिपाशा बासूनं 'या' मराठमोळ्या मॉडेलला केलं होतं डेट?

Bipasha Basu Love Affairs: बिपाशा बासू ही आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे. तिच्या लव्ह अफेअर्सच्याही (Love Stories) चर्चा अनेकदा होताना दिसतात. सध्या अशाच काही चर्चांना उधाण आलं आहे. तुम्हाला माहितीये का की बिपाशानं मराठमोळ्या (Marathi Model) मॉडेलला डेट केलं होतं. 

Updated: Mar 17, 2023, 08:41 PM IST
Bipasha Basu Love Affairs: करण सिंग ग्रोवर अन् जॉन अब्राहमच्या आधी बिपाशा बासूनं 'या' मराठमोळ्या मॉडेलला केलं होतं डेट? title=
bipasha basu most discussed love affairs know the full list of the men bipasha dated before marriage

Bipasha Basu Love Affairs: बिपाशा बासू ही (Bipasha Basu Marriage) आजची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिपाशानं काही दिवसांपुर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिच्या प्रेग्ननसीच्याही चर्चा रंगताना दिसल्या होत्या. तिचे प्रेग्नन्सी फोटोशूटही खूप व्हायरल होत होते. मध्यंतरी तिच्या बेबी बंप, प्रेग्नन्सी आणि फोटोशूटमध्ये सोशल मीडियावर तिचीच (Bipasha Basu Pregnancy) चर्चा होती. करण सिंह ग्रोवरशी तिनं काही वर्षांपुर्वी लग्न केले. त्याआधी ते दोघंही एकमेकांना डेट करत होते. परंतु तुम्हाला माहितीये का की करण सिंग ग्रोवरच्या आधीही तिची अनेक लव्ह अफेअर्स ही गाजली आहेत. त्यातून तिनं याआधी एका मराठमोळ्या मॉडेलला (Love Affairs of Bipasha Basu) डेट केले होते. तुम्हाला माहितीये का की तो मराठमोळा अभिनेता-मॉडेल आहे तरी कोण? (bipasha basu most discussed love affairs know the full list of the men bipasha dated before marriage)

बिपाशा बासू अन् अधुरी प्रेम कहाणी 

बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम यांच्या लव्ह अफेअरची तेव्हा खूप चर्चा रंगली होती. अनेकांना ते मॅरिड (John Ibrahim and Bipasha Basu Relationship) आहेत का असेही वाटतं होते. परंतु ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. 9 वर्षे सलग एकमेकांना डेट केल्यानंतर ते वेगळे झाले. आता जॉन सिंगल आहे. बिपाशा बासू ही आपल्या अनेक चित्रपटांमुळे फेमस झाली आहे. परंतु तिच्या 'दम मारो दम' (Rana Daggubati) या चित्रपटाच्या वेळी तिनं दाक्षिणात्त्य सुपरस्टार राणा डग्गुबातीसोबत काम केले होते. 'बाहुबली' या चित्रपटामुळे राणा डग्गुबातीला विशेष लोकप्रियता मिळाली होती. त्या चित्रपटाच्या दरम्यान त्या दोघांमध्ये प्रेम सुरू झाले होते परंतु हे नातं काही काळच टिकलं. राणा डग्गुबातीही आता विवाहित आहे. 

'राज' या चित्रपटामुळे बिपाशा बासू ही चर्चेत आली होती. तेव्हा अभिनेता डिनो मोरियासोबत तिच्या लव्ह अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु त्यानंतर तिच्या आयुष्यात जॉन अब्राहमचा प्रवेश झाला. त्या दोघांचे नाते तेव्हा खूप गाजले होते हे दोघं एकमेकांना डेट करणार यावरच अनेकांनी विश्वास ठेवला होता. तेव्हाची कॉलेजवयीन मुलं त्या दोघांच्या प्रेमात होती. त्यांचे अनेक चाहते त्यांच्या डेटिंगचे कौतुक करायचे परंतु त्या दोघांचे रिलेशनशिप तुटल्यानंतर मात्र चाहत्यांना धक्का बसला. 

'या' मराठी अभिनेत्याला केलं डेट? 

समोर आलेल्या माहितीनुसार, बिपाशानं अभिनेता मिलिंद सोमणला (Milind Soman) डेट केले होते. असं म्हणतात की तो तिचा पहिला बॉयफ्रेंड होता. परंतु ते लगेचच विभक्त झाले.